'गोमातेच्या संरक्षणासाठी' पतंजलिनं घेतली भूमिका..

हिंदूधर्मात गोमातेला महत्वाचे स्थान दिले गेले आहे; पण तरीही गेल्या काही दिवसांपासून गोमातेची कत्तल होण्याचे प्रकार वाढले आहेत..
Yog Guru Ramdevbaba : 'गोमातेच्या संरक्षणासाठी' पतंजलिनं घेतली भूमिका
Yog Guru Ramdevbaba : 'गोमातेच्या संरक्षणासाठी' पतंजलिनं घेतली भूमिका Dainik Gomantak

भारतातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपती देवस्थान TTD तर्फे 'गो महासंमेलनाचा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महासंमेलनात योगगुरु रामदेव बाबा (Yog Guru Ramdevbaba) सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी गाईला (Cow) राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे अशी मागणी केली.

Yog Guru Ramdevbaba : 'गोमातेच्या संरक्षणासाठी' पतंजलिनं घेतली भूमिका
'ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर'

"गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे मी मागणी करतो की त्यांनी लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करून 'गो मातेला' राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे" असे त्यांनी विधान केले. हिंदूधर्मात गोमातेला महत्वाचे स्थान दिले गेले आहे; गायीला माता मानले जाते, पण तरीही गेल्या काही दिवसांपासून गोमातेची कत्तल होण्याचे प्रकार वाढले आहेत. काही लोकांना गोमातेचे मांस जास्त प्रिय आहे, त्यातील काही हिंदू लोक ही आहेत. हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धा दुखावल्याने देश कमकुवत होतो. जिभेच्या चवीसाठी जीव हिसकावण्याचा अधिकार कोणालाच नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. गोमांस खाणे हा कोणाचाही मूलभूत अधिकार नाही.

Yog Guru Ramdevbaba : 'गोमातेच्या संरक्षणासाठी' पतंजलिनं घेतली भूमिका
गोवा कसिनोमध्ये जिंकलेले 50 लाख रुपये हडण्यासाठी केले भाचीला किडनॅप

गोमातेची हत्या थांबवा असे सरकारचे आदेश असून सुद्धा सर्रासपणे गोमातेची हत्या करून तस्करी केली जाते. गाईपासून आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, आणि तरीही याचा विचार केला जात नाही; म्हणूनच रामदेव बाबांनी ही मागणी केली.

नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार, आयुर्वेदिक उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या पतंजलिने गोरक्षणसाठी एक मोहीम हाती घेतली आहे. आणि या मोहिमे अंतर्गत गायींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उचलून धरला असून, सदैव त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com