Rahul Gandhi म्हणाले, "लग्नासाठी मला अशी मुलगी हवीयं..."

आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यासारखे गुण असलेली मुलगी मला लग्नासाठी हवी आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Rahul Gandhi: आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यासारखे गुण असलेली मुलगी मला लग्नासाठी हवी आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एका ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आजीसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, “त्यांचे स्थान माझ्या आयुष्यात अनमोल आहे. त्या माझी दुसरी आई होत्या."

दरम्यान, इंदिरा गांधींसारखे (Indira Gandhi) गुण असलेल्या कोणाशी लग्न करायचे आहे का, असे विचारले असता राहुल म्हणाले की, "हा एक मनोरंजक प्रश्न आहे. मला अशी मुलगी हवी आहे, जिच्यात माझ्या आजी आणि आईसारखे गुण असावेत."

Rahul Gandhi
Rahul Gandhi T-Shirt: पुन्हा थंडी, पुन्हा हाफ टी-शर्ट... राहूल गांधींना पत्रकाराने विचारले कारण

तसेच, ते पुढे असेही म्हणाले की, 'कोणी मला 'पप्पू' म्हटले तर वाईट वाटत नाही, कारण हा सर्व प्रचाराचा भाग आहे आणि जे असे बोलतात ते त्यात आहेत.'

राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले की, “मी कोणाचाही द्वेष करत नाही. ते मला शिवीगाळ करतात... परंतु मी त्यांचा तिरस्कार करणार नाही.'' या मुलाखतीत त्यांनी वाहने आणि दुचाकींबद्दलही सविस्तर चर्चा केली आणि सांगितले की, 'आपल्याकडे स्वतःची अशी कोणतीही कार नाही, परंतु आईकडे एक गाडी आहे.' राहुल पुढे असेही म्हणाले की, "मी जेव्हा लंडनमध्ये राहायचो, तेव्हा मी 'RS 20' बाइक चालवत असे."

Rahul Gandhi
Rahul Gandhi: 'हिंदू- मुस्लीम वाद फक्त...', मोदींवर टीकास्त्र

शेवटी, राहुल गांधी म्हणाले की, 'मला सायकलिंग आवडते आणि एकेकाळी लॅम्ब्रेटा (स्कूटर) आवडायचे. दुसरीकडे, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भारत इलेक्ट्रिक वाहने आणि ड्रोनमध्ये अजूनही मागे आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi On CJP NEET Paper Leak Protest
Sonia Gandhi Education System
Delhi youth protest parliament march
Rahul Dravid England Test Head Coach Race
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com