World Elephant Day 2025: गजराजाची भव्य मिरवणूक, पारंपारिक वाद्यांचा गजर, अन्...; जाणून घ्या जागतिक हत्ती दिनानिमित्त केरळातील अनोखा 'त्रिशूर पूरम उत्सव'!

Thrissur Pooram Elephant Festival: त्रिशूर पूरमचा इतिहास सुमारे 200 वर्षांहून अधिक जुना आहे. या उत्सवाची सुरुवात 1796 मध्ये कोचीनचे तत्कालीन महाराज शक्तन थंपुरण यांनी केली होती.
World Elephant Day 2025
World Elephant DayDainik Gomantak
Published on
Updated on

थोडक्यात

1. दरवर्षी मोठ्या उत्साहात 'जागतिक हत्ती दिन' साजरा केला जातो.

2. केरळातील त्रिशूर महोत्सव हत्तीशी असलेले विशेष नाते दर्शवतो.

3.त्रिशूर पूरमचा इतिहास सुमारे 200 वर्षांहून अधिक जुना आहे.

World Elephant Day 2025: दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस जगभरात 'जागतिक हत्ती दिन' म्हणून साजरा केला जातो. हत्तींच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. याच दिनानिमित्त भारतातील हत्तींच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाचा एक अनोखा आणि भव्य सोहळा म्हणजेच केरळचा प्रसिद्ध 'त्रिशूर पूरम' (Thrissur Pooram) उत्सव आठवल्याशिवाय राहत नाही. हा उत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नसून केरळची संस्कृती, कला, भक्ती आणि येथील लोकांचे हत्तींशी असलेले विशेष नाते दर्शवणारा एक महाउत्सव आहे.

त्रिशूर पूरमचा इतिहास सुमारे 200 वर्षांहून अधिक जुना आहे. या उत्सवाची सुरुवात 1796 मध्ये कोचीनचे तत्कालीन महाराज शक्तन थंपुरण यांनी केली होती. त्याकाळी, 'अरट्टुपुझा पूरम' हा सर्वात मोठा हत्ती उत्सव होता. पण एकदा पावसाळ्यामुळे काही मंदिरांना (Temples) तिथे पोहोचता आले नाही. त्यामुळे, शक्तन थंपुरण यांनी त्रिशूरमधील 10 प्रमुख मंदिरांना एकत्र आणून हा भव्य सोहळा सुरु केला.

World Elephant Day 2025
Kerala Temple Crocodile: मंदिराचे रक्षण करणारी, प्रसाद खाऊन राहणारी 'मगर'; केरळच्या श्रीअनंत पद्मनाभ मंदिरातील अद्भुत गोष्ट

दोन मंदिरांमधील मैत्रीपूर्ण स्पर्धा

त्रिशूर पूरमची खरी ओळख म्हणजे दोन प्रतिस्पर्धी मंदिरांमधील, परमेक्कावु (Paramekkavu) आणि थिरुवंबडी (Thiruvambadi), हत्तींची मिरवणूक आणि मैत्रीपूर्ण स्पर्धा. हे दोन्ही गट मोठ्या उत्साहात आपापल्या हत्तींना सजवून मिरवणुकीत उतरवतात. हा सोहळा त्रिशूर शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक 'वडक्कुमनाथन' मंदिराच्या मैदानावर पार पडतो. हा उत्सव केवळ धार्मिक नसून तो या दोन गटांमधील एकीचे आणि सांस्कृतिक स्पर्धेचे प्रतीक आहे.

हत्तींची भव्य मिरवणूक आणि कुडामट्टम

त्रिशूर पूरमचे सर्वात मोठे आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे आकर्षण म्हणजे हत्तींची भव्य मिरवणूक. या मिरवणुकीत दोन्ही मंदिरांकडून 15-15 हत्ती सहभागी होतात. या हत्तींना सोन्याचे आणि चांदीचे 'नेट्टीपट्टम' (सुंदर मुखवटे) घातले जातात, गळ्यात आकर्षक घंटा आणि इतर अलंकार परिधान केले जातात. या मिरवणुकीत हत्तींच्या पाठीवर तीन व्यक्ती बसतात. त्यापैकी एक व्यक्ती 'मुत्तुकुडा' (रंगीबेरंगी छत्र्या) आणि 'वेंचामरम' (चवर) घेऊन उभी असते.

World Elephant Day 2025
Kerala High Court: वडील मुस्लिम अन् आई हिंदू! पोरगा म्हणाला, मी इस्लाम मानत नाही; हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

दरम्यान, या सोहळ्यातील सर्वात खास क्षण म्हणजे 'कुडामट्टम' (Kudamattom). यामध्ये हत्तीच्या पाठीवर बसलेले लोक एका विशिष्ट तालावर आणि वेगात वेगवेगळ्या रंगांच्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या छत्र्या बदलतात. ही स्पर्धा परमेक्कावु आणि थिरुवंबडी मंदिरांमध्ये चालते. विविध रंगांच्या छत्र्या आणि त्यांची बदलण्याची कला पाहून प्रेक्षक रोमांचित होतात. हा सोहळा म्हणजे केरळच्या (Kerala) कलेचा आणि हस्तकलेचा एक अद्भुत नमुना आहे.

पारंपरिक वाद्यवृंद आणि आतषबाजी

त्रिशूर पूरमचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे पारंपारिक वाद्यांचा गजर, ज्याला 'पांडिमेळम' किंवा 'पंचवाद्यम' म्हणतात. शेकडो कलाकार पारंपरिक वाद्ये, जसे की चेंडा, इडक्का, तिमिला आणि कोम्पू, वाजवून उत्सवात एक अनोखी ऊर्जा निर्माण करतात. या संगीतामुळे संपूर्ण वातावरण भारावून जाते. उत्सवाची सांगता पहाटे होणाऱ्या भव्य आतषबाजीने, म्हणजेच 'वेदिक्केट्टु' (Vedikkettu) ने होते. ही आतषबाजी एवढी भव्य असते की, केरळमध्ये यासारखी दुसरी आतषबाजी पाहायला मिळत नाही. आकाशात एकाच वेळी विविध रंगांच्या आणि आकारांच्या फटाक्यांची आतषबाजी होते, ज्यामुळे रात्रही दिवसासारखी तेजस्वी वाटते.

World Elephant Day 2025
Monsoon Arrived In Kerala: 16 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडतंय, केरळमध्ये 8 दिवस आधीच पावसाचं आगमन

हत्तींचे महत्त्व आणि संवर्धनाचे आव्हान

केरळमध्ये हत्तींना केवळ उत्सवांपुरते महत्त्व नाही, तर ते येथील लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा भाग आहेत. ते शक्ती, समृद्धी आणि राजेशाहीचे प्रतीक आहेत आणि अनेक मंदिरांमध्ये त्यांना देवाचा अंश मानले जाते. मात्र, जागतिक हत्ती दिन आपल्याला या भव्य प्राण्यांच्या संवर्धनाची आठवण करुन देतो. गेल्या काही वर्षांपासून हत्तींच्या कल्याणाबाबत काही प्राणी हक्क संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. हत्तींना अनेक तास उन्हात उभे ठेवणे, आतषबाजीच्या आवाजामुळे त्यांना होणारा त्रास यांसारखे मुद्दे चर्चेत आहेत.

3 प्रश्न आणि उत्तरे

1. जागतिक हत्ती दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर: दरवर्षी जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

2. त्रिशूर पूरम उत्सव किती वर्ष जुना आहे?

उत्तर: हा उत्सव 200 वर्षे जुना आहे.

3. आजच्या काळात हत्तींचे संरक्षण गरजेचे बनले आहे का?

उत्तर: होय, हत्तींचे संरक्षण गरजेचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com