World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

World Athletics Championship: वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या भालाफेकपटूंना निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले.
World Athletics Championship Neeraj Chopra
Neeraj ChopraDainik Gomantak
Published on
Updated on

World Athletics Championship, Javelin Throw Final: ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोठा धक्का बसला. जपानची (Japan) राजधानी टोक्यो येथे झालेल्या स्पर्धेतील अंतिम फेरीत नीरजला अत्यंत खराब कामगिरीमुळे पदकापासून वंचित राहावे लागले. नीरजने आपल्या लौकिकानुसार कामगिरी न केल्याने त्याला टॉप-6 मध्येही स्थान मिळवता आले नाही, ज्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

दरम्यान, नीरजची ही कामगिरी त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक राहिली. त्याने आपल्या पहिल्या थ्रोमध्ये 83.65 मीटरचे अंतर गाठले, परंतु त्यानंतर त्याच्या कामगिरीमध्ये सातत्याने घसरण होत गेली. त्याचा सर्वोत्तम थ्रो 84.03 मीटर इतकाच राहिला. त्याचे इतर थ्रो 82.86 मीटर होते आणि दोन थ्रो फाउल ठरले. या खराब कामगिरीमुळे त्याला अंतिम फेरीतच स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. नीरज चोप्रासोबतच पाकिस्तानचा अर्शद नदीम यालाही आपल्या कामगिरीत कमाल करता आली नाही. त्याने केवळ 82.73 मीटर अंतर गाठले आणि तो देखील टॉप-6 मध्ये स्थान मिळवू शकला नाही.

World Athletics Championship Neeraj Chopra
National Para Athletics Championship: गोव्याची साक्षी चमकली! 23व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत केली 'सुवर्ण' कामगिरी

सचिन यादवची चमकदार कामगिरी

एकीकडे नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि अर्शद नदीमसारखे दिग्गज खेळाडू संघर्ष करत असताना भारताच्याच दुसऱ्या भालाफेकपटू सचिन यादवने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने 86.27 मीटरचा अप्रतिम थ्रो करत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. या कामगिरीमुळे तो नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम या दोन्ही दिग्गजांपेक्षा पुढे राहिला. सचिनने अंतिम फेरीत चौथे स्थान मिळवले आणि पदकाला अगदी थोडक्यात हुकला. त्याच्या या कामगिरीने भारताला काहीसा दिलासा मिळाला असून भविष्यातील स्पर्धांसाठी एक नवीन आशा निर्माण झाली आहे.

वालकॉटने पटकावले सुवर्णपदक

दरम्यान, या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा मान त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या वालकॉटने मिळवला. त्याने 88.16 मीटरचा थ्रो करत पहिले स्थान पटकावले आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद आपल्या नावावर केले. दुसऱ्या क्रमांकावर ग्रेनाडाचा पीटर्स राहिला, ज्याने 87.38 मीटरचे अंतर गाठून रौप्यपदक जिंकले. तर, अमेरिकेचा कर्टिस थॉम्प्सन याने 86.67 मीटरच्या थ्रोसह कांस्यपदक मिळवले.

World Athletics Championship Neeraj Chopra
World Athletics Championships: नीरज चोप्राची मोठी कामगिरी, जागतिक स्पर्धेत 19 वर्षानंतर भारताची बाजी

दुसरीकडे, या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची कामगिरी मिश्र स्वरुपाची राहिली असली तरी, सचिन यादवच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे भारतीय भालाफेकचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. नीरज चोप्राचा खराब दिवस होता, मात्र त्याचे चाहते आगामी स्पर्धांमध्ये तो नक्कीच दमदार पुनरागमन करेल अशी आशा बाळगून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com