Viral Video: 'शरारा-शरारा' गाण्यावर तरुणीचा किलर परफॉर्मन्स; नेटिझन्स म्हणाले, 'तिने हातातून रबर बँड...'

Social Media: सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ तूफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणीने 'चोली के पीचे क्या है' गाण्यावर डान्स केला होता.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak

Social Media: सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ तूफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणीने 'चोली के पीचे क्या है' गाण्यावर डान्स केला होता. तिच्या बोल्ड मूव्ह्सने सोशल मीाडियावर धुमाकूळ घातला होता.

आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये साडीतील एक तरुणी 'शरारा-शरारा' गाण्यावर आपल्या डान्सने धुमाकूळ घालत आहे. तरुणीने इतका अप्रतिम परफॉर्मन्स दिला आहे की, लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ (Viral Video) कॉलेजच्या एका फंक्शनदरम्यान शूट करण्यात आल्याचे समजते. ज्यामध्ये आशा भोसले यांच्या 'शरारा-शरारा' गाण्यावर तरुणी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. दुसरीकडे, ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सच्या विविध प्रतिक्रीया येत आहेत. एकूणच या तरुणीने आपल्या स्टाईलने नेटिझन्सना खल्लास केले आहे.

Viral Video
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! 'मास्तराला अटक करा तरच...', शोषणाला कंटाळलेल्या मुलींची थेट कोर्टात धाव

व्हिडिओ पाहा...

दुसरीकडे, तरुणीचा साडीतील किलर डान्सचा व्हिडिओ तृप्ती ठाकूर नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

8 मे रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ क्लिपने सोशल मीडियावर (Social media) धूमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 3.7 लाखांहून अधिक यूजर्संनी या व्हिडिओला लाईक केले आहे, तर कमेंटचा महापूर आला आहे.

Viral Video
डॉक्टरच्या घरातून मोलकरणीने एक-एक दागिना केला चोरी, व्हॉट्सॲप DP मुळे उघड झाला प्रकार

दरम्यान, एका यूजरने कमेंट केली की, 'अरे काय पाहिलंय. पुन्हा-पुन्हा पाहा.' तर दुसरा म्हणाला, 'संपूर्ण डान्स झाला पण तिने हातातून रबर बँड सोडला नाही.' आणखी एक युजर म्हणाला की, 'जर तिने काळी साडी परिधान केली असती तर परफॉर्मन्स अप्रतिम झाला असता.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com