700 लोकांनी ठेवला महिलेवर विश्वास; पैसे घेऊन बाई 'नौ दो ग्यारह'

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 48 वर्षीय महिला आरोपी सुनीता सैनीला गुजरातमधून अटक केली आहे.
Arrest
Arrest Dainik Gomantak
Published on
Updated on

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 700 लोकांना 4 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेने लोकांना चार वर्षात पैसे दुप्पट करण्याचा दावा करून आपल्या कंपनीत पैसे गुंतवायला लावले होते.

Arrest
'मी रशियाच्या लोकांसोबत बोलत आहे' जे. पी. नड्डांचं Twitter अकाऊंट हॅक

दिल्ली पोलिसांच्या (Police) आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 48 वर्षीय महिला आरोपी सुनीता सैनीला गुजरातमधून अटक केली आहे. ती मूळची गुजरातमधील सुरत (Surat) शहराची रहिवाशी आहे. आरोपी महिला सुनीता हिच्यावर 700 लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Arrest
धक्कादायक! युट्यूब पाहून लॉजमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया; बी फार्मच्या विद्यार्थ्यांचे कृत्य

सुनीताने पीडितांचे पैसे दुप्पट करण्याचा दावा केला होता. तिने सामान्य लोकांना आपल्या कंपनीत बचत खाते, मुदत ठेव खाते आणि इतर खाती उघडण्यासाठी आकर्षक ऑफर दिल्या. लोभापोटी आरोपीच्या कंपनीत 700 हून अधिक लोकांची खाती उघडली आणि ते फसवणुकीला बळी पडले.

याबाबत 5 जणांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. पुढे तक्रारदारांची संख्या वाढतच गेली. EOW च्या अधिकारी छाया शर्मा यांनी तात्काळ तपास सुरू केला. दिल्ली पोलिसांनी गुजरातमधील (Gujarat) सुरत शहरातून आरोपीला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com