B Pharm students Performed gender reassignment surgery watching YouTube Video
B Pharm students Performed gender reassignment surgery watching YouTube Video Dainik Gomantak

धक्कादायक! युट्यूब पाहून लॉजमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया; बी फार्मच्या विद्यार्थ्यांचे कृत्य

लॉजच्या कर्मचाऱ्यांना आढळला खोलीत मृतदेह
Published on

आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बी फार्माच्या (Bachelor of Pharmacy) दोन विद्यार्थ्यांनी एका व्यक्तीचे ऑपरेशन केले ज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. नेल्लोर येथील लॉजवर गुरुवारी लिंग रिअसाइनमेंट सर्जरी करण्यात आली. त्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. लॉजच्या कर्मचाऱ्यांना खोलीत व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने ही बाब उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय श्रीकांत असे मृताचे नाव आहे. श्रीकांत विवाहित होता आणि पत्नीला सोडून गेला होता. तो एकटाच राहत होता. यादरम्यान तो फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. यावेळी श्रीकांतने लिंग बदलाबाबत चर्चा केली असता विद्यार्थ्यांनी त्याच्यावरच प्रयोग करण्याचे धाडस केले.

B Pharm students Performed gender reassignment surgery watching YouTube Video
एव्हिएशन अकादमीच्या विमानाचा भीषण अपघात पायलटचा मृत्यू

ऑपरेशनसाठी केले स्वस्तात तयार

बी फार्माचे विद्यार्थी मस्तान आणि जीवा यांनी श्रीकांतला स्वस्त दरात लिंग बदलासाठी तयार केले. लिंग रिअसाइनमेंट सर्जरी यशस्वी करण्याचे आश्वासनही दिले. आणि ही बाब गुपित राहण्याची हमी दिली.

B Pharm students Performed gender reassignment surgery watching YouTube Video
Russia-Ukraine War: युक्रेनमधून परतले भारतीय विद्यार्थी, मोदींचे केले कैतुक

यानंतर दोन्ही विद्यार्थी श्रीकांतसोबत त्याच्या खासगी लॉजवर पोहोचले. यावेळी जीवा आणि मस्तानने यूट्यूब वरचे व्हिडिओ पाहून श्रीकांतचे ऑपरेशन करण्यास सुरूवात केली. या ऑपरेशन दरम्यान जास्त रक्तस्राव झाल्याने श्रीकांतचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लिंग बदल केल्यानंतर श्रीकांतला मुंबईला जायचे होते

यूट्यूब पाहून ही शस्त्रक्रिया करणाऱ्या मस्तान आणि जीवा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दुसरीकडे, श्रीकांत हा प्रकाशम जिल्ह्यातील रहिवासी होता आणि हैदराबादमध्ये मजूरी करून पोट भरत होता. लिंग रिअसाइनमेंट सर्जरी करून त्याला मुंबईला जायचे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com