असदुद्दीन ओवैसीनी पाकचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांना विचारला बोचरा प्रश्न; मोदींच्या आदमपूर भेटीनंतर केली पोस्ट

Asaduddin Owaisi: ऑपरेशन सिंदूर ही सामान्य लष्करी कारवाई नाही. ती भारताच्या धोरणाचा, हेतूंचा आणि निर्णायकतेचा संगम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१३ मे) सकाळी आदमपूर येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर सैनिकांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांचे आभार करत त्यांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक केले. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना व्यंग्यात्मक स्वरात एक तिखट प्रश्न विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदमपूर भेटीचे फोटो समोर आल्यानंतर, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे. "एस शरीफ आणि ए मुनीर हे त्यांचे भाडेतत्त्वावरील चिनी विमान रहीम यार खान एअरबेसवर उतरवू शकतील का?" असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

Asaduddin Owaisi
Goa Rain: राज्यात सरी बरसणार! वादळी वाऱ्यासाह पाऊस लावणार हजेरी; तीन दिवसांसाठी यलो अलर्ट

आदमपूर एअरबेसवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांशी संवाद साधला. “जेव्हा आपले ड्रोन शत्रूच्या भिंती उद्ध्वस्त करतात, जेव्हा आपली क्षेपणास्त्रे कर्कश आवाजात लक्ष्यापर्यंत पोहोचतात तेव्हा शत्रूला 'भारत माता की जय' ऐकू येते. जेव्हा आपण रात्रीही सूर्यप्रकाशित करतो तेव्हा शत्रूला 'भारत माता की जय' ऐकू येते."

Asaduddin Owaisi
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर 3 वाहनांचा भीषण अपघात; तरूण-तरूणी जागीच ठार, 8 जण जखमी

जेव्हा आपले सैन्य अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीला जुमानत नाही तेव्हा आकाशातून फक्त एकच गोष्ट ऐकू येते - 'भारत माता की जय'. तुम्ही सर्वांनी कोट्यवधी भारतीयांना अभिमानित केले आहे, प्रत्येक भारतीयाच्या आईला अभिमानित केले आहे, तुम्ही इतिहास रचला आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"ऑपरेशन सिंदूर ही सामान्य लष्करी कारवाई नाही. ती भारताच्या धोरणाचा, हेतूंचा आणि निर्णायकतेचा संगम आहे. भारत ही बुद्ध आणि गुरु गोविंद सिंह जी यांची भूमी आहे. जेव्हा आमच्या बहिणी आणि मुलींचे सिंदूर पुसले गेले, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना चिरडून टाकले," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com