Divorce: पत्नीने हनिमूनच्या वेळी तोकडे कपडे घातले, पती भांडत नाही... वकिलाने उघड केली घटस्फोटाची विचित्र कारणे

Weird Reasons For Divorce: दुसरा एक यूजर म्हणाला, "माझ्या मते घटस्फोट झाले पाहिजेत. घटस्फोट घेणे चुकीचे नाही पण याचा अर्थ असा नाही की लोकांनी अशा विचित्र कारणांसाठी किंवा मूर्खपणाच्या गोष्टींसाठी घटस्फोट घ्यावा."
Weird Reasons For Divorce
Weird Reasons For DivorceDainik Gomantak
Published on
Updated on

Wife Dressed Short Clothes On Honeymoon, Husband Doesn't Fight... Lawyer Reveals Weird Reasons For Divorce:

ज्या विवाहित जोडप्यांना असे वाटते की, त्यांच्यातील नातेसंबंध व्यवस्थित नसतात ते घटस्फोटाचा पर्याय निवडतात. छळ आणि हिंसाचार यांसारख्या लग्न मोडण्याच्या गंभीर कारणांव्यतिरिक्त, एका वकिलाने घटस्फोट घेण्याच्या काही विचित्र कारणांकडे लक्ष वेधले.

तान्या कौल नावाच्या, वकिलाने एखाद्याचे वैवाहिक नातेसंबंध का संपुष्टात येतात यामागील विचित्र आणि मूर्खपणाची कारणे लक्षात घेऊन इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केला आहे.

घटस्फोटाची विचित्र कारणे

तान्या कौल यांनी लोकांच्या घटस्फोट घेण्याच्या काही उघड केलेल्या कारणांमध्ये नवविवाहित पत्नीने हनिमूनच्या वेळी अश्लील वेशभूषा केली होती. त्यामुळे पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

यावेळी तान्या यांना असा प्रश्न वकिलाला पडला की, हनिमून आनंदी आणि कामुक होणे अपेक्षित असल्याने पत्नीने तसे केले असेल. पण पतीने यामुळे टोकाचा निर्णय घेतला.

यावेळी तान्या यांनी रीलला कॅप्शन दिले: "मतलब शादी ही क्यूं करना है ?"

Weird Reasons For Divorce
"तुम्हाला तो हक्क नाही," अडीच लाख पगार असलेल्या महिलेला हायकोर्टने नाकारली पोटगी

पती खूप प्रेम करतो

"पती खूप प्रेम करतो, माझ्याकडे खूप लक्ष देतो आणि अजिबात भांडत नाही," या कारणासाठी एका पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे तान्या यांनी यावेळी रीलमधून सांगितले.

रीलमध्ये नमूद केलेल्या घटस्फोटाच्या काही कारणांमध्ये जोडीदाराने आपला सर्व वेळ स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देणे, पत्नीला स्वयंपाक करता येत नाही आणि पत्नीने पतीच्या पायाला हात लावण्यास नकार देणे यांचाही समावेश आहे.

Weird Reasons For Divorce
Divorce: 38 वर्षे तारीख पे तारीख! निवृत्त इंजीनिअरला घटस्फोटासाठी पाहावी लागली 4 दशके वाट

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

वकील तान्या कौल यांच्या या रीलवर अनेक नेटिझन्स विविध प्रतिक्राय देत आहेत. काहींनी संबंध सोडण्याला मूर्खपणाचे कारण म्हटले, तर काहींनी ते वैध असल्याचे म्हटले.

"नवऱ्याच्या पायाला हात लावा? ही संस्कृती नव्हे, दडपशाही आहे, जर तुम्ही एखाद्याच्या पायाला स्पर्श करणे हे आदराचे लक्षण म्हणून पाहत असाल तर ते लग्नात दोन्ही प्रकारे चालले पाहिजे," असे मत एकाने व्यक्त केले.

दुसरा एक यूजर म्हणाला, "माझ्या मते घटस्फोट झाले पाहिजेत. घटस्फोट घेणे चुकीचे नाही पण याचा अर्थ असा नाही की लोक अशा विचित्र कारणांमुळे किंवा मूर्खपणाच्या गोष्टींसाठी घटस्फोट घ्यावा."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com