Same Gender Marriage: कोण आहेत न्यायमूर्ती रवींद्र भट्ट? जे म्हणाले, मी सरन्यायाधीशांच्या निर्देशांशी सहमत नाही

Justice Ravindra Bhatt: न्यायमूर्ती रवींद्र भट्ट म्हणाले, "समलींगी जोडप्यांमध्ये विवाहाचा घटनात्मक अधिकार किंवा कायदेशीर मान्यता नसताना न्यायालय राज्याला कोणत्याही बंधनात टाकू शकत नाही."
Who is Justice Ravindra Bhatt? Said, I do not agree with the instructions of the Chief Justice On Same Gender Marriage.
Who is Justice Ravindra Bhatt? Said, I do not agree with the instructions of the Chief Justice On Same Gender Marriage. Dainik Gomantak
Published on
Updated on

Who is Justice Ravindra Bhatt? Said, I do not agree with the instructions of the Chief Justice On Same Gender Marriage:

भारतातील LGBTQIA+ समुदायाला विवाह समानतेचा अधिकार देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 3-2 अशा फरकाने समलिंगी विवाह कायदेशीर करण्यास नकार दिला आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले, 'आम्ही समलिंगी विवाहाला मान्यता देऊ शकत नाही. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणे हे संसदेचे आणि राज्य विधानमंडळांचे काम आहे.

दरम्यान, या खंडपीठात समाविष्ट असलेले न्यायमूर्ती रवींद्र भट्ट म्हणाले की, विशेष विवाह कायद्याबाबत (Special Marriage Act) सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी जारी केलेल्या निर्देशांशी ते सहमत नाहीत.

न्यायमूर्ती रवींद्र भट्ट सरन्यायाधीशांचे निर्देश का मान्य नाहीत?

न्यायमूर्ती रवींद्र भट्ट म्हणाले, "नातेसंबंधाचा अधिकार आहे हे आम्ही मान्य केले असले तरी, आम्ही स्पष्टपणे मानतो की, तो कलम 21 अंतर्गत येतो.

जोडीदार निवडण्याचा अधिकार आणि त्यांच्याशी शारीरिक संबंधांचा आनंद घेण्यामध्ये गोपनीयता, स्वायत्तता इत्यादींचा समावेश आहे. जीवनसाथी निवडण्याचा पर्याय अस्तित्वात आहे यात शंका नाही."

न्यायमूर्ती रवींद्र भट्ट म्हणाले की, समलिंगी जोडप्यांना मुले दत्तक घेण्याच्या अधिकारावर ते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्याशी असहमत आहेत आणि या विषयावर काही चिंता वाटतात.

न्यायमूर्ती रवींद्र भट्ट म्हणाले, "समलिंगी जोडप्यांमध्ये विवाहाचा घटनात्मक अधिकार किंवा कायदेशीर मान्यता नसताना न्यायालय राज्याला कोणत्याही बंधनात टाकू शकत नाही."

Who is Justice Ravindra Bhatt? Said, I do not agree with the instructions of the Chief Justice On Same Gender Marriage.
Same Gender Marriage: LGBT म्हणजे काय, ते एकमेकांपासून वेगळे कसे असतात?

न्यायमूर्ती रवींद्र भट्ट कोण आहेत?

न्यायमूर्ती रवींद्र भट्ट हे सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती आहेत. 23 सप्टेंबर 2019 रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. 64 वर्षीय न्यायमूर्ती रवींद्र भट्ट 20 ऑक्टोबर 2023 रोजी निवृत्त होणार आहेत.

न्यायमूर्ती रवींद्र भट्ट हे यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ 5 मे 2019 ते 22 सप्टेंबर 2019 असा होता. न्यायमूर्ती रवींद्र भट्ट हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही राहिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात त्यांचा कार्यकाळ 16 जुलै 2004 ते 4 मे 2019 असा होता.

Who is Justice Ravindra Bhatt? Said, I do not agree with the instructions of the Chief Justice On Same Gender Marriage.
Same Gender Marriage बाबत निकाल देताना CJI काय म्हणाले? प्रत्येकाने वाचावे असे 10 महत्त्वाचे मुद्दे

न्यायमूर्ती रवींद्र भट्ट यांचे सुरुवातीचे जीवन

त्यांचे पूर्ण नाव श्रीपती रवींद्र भट्ट आहे. फरिदाबादच्या केंद्रीय विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून इंग्रजीमध्ये बी.ए. चे शिक्षण घेतले. 1982 मध्ये, न्यायमूर्ती भट यांनी कॅम्पस लॉ सेंटर, लॉ फॅकल्टी, दिल्ली विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतली.

न्यायमूर्ती भट्ट 1982 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये सामील झाले आणि त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी 1989 मध्ये अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड (AOR) म्हणून नावनोंदणी केली. ते प्रामुख्याने सार्वजनिक कायदा, रोजगार, शिक्षण आणि घटनात्मक विवादांमध्ये प्रॅक्टीस करायचे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com