कुठे आहे महागाई? देशातील 'या' शहरात 3 दिवसांत 7 कोटींच्या तब्बल 1137 फ्लॅटची विक्री

DLF लिमिटेडचा प्रोजेक्ट; सर्व फ्लॅट पाच टॉवरमध्ये बांधणार
Gurugram DLF Project File Photo
Gurugram DLF Project File PhotoDainik Gomantak
Published on
Updated on

Gurugram DLF Project: एकीकडे देशात महागाईचा प्रकोप वाढत चालला आहे. घरगुती गॅस, इंधन दरांच्या किंमती, गृहकर्जाचा वाढलेला हप्ता यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे मात्र याविरूद्ध चित्र दिसून येत आहे.

देशात प्रीमियम फ्लॅट्सच्या विक्रीत मोठा प्रतिसाद दिसून आला आहे. रिअल इस्टेट कंपनी DLF लिमिटेडने देशाची राजधानी दिल्लीजवळ गुरुग्राम येथील एका निवासी प्रकल्पात तीन दिवसांत 1,137 लक्झरी अपार्टमेंट विकले आहेत.

या अपार्टमेंटमधील प्रत्येक फ्लॅटची किंमत 7 कोटी रुपयांहून जास्त आहे आणि त्यांच्या विक्रीतून कंपनीला 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.

Gurugram DLF Project File Photo
Biden-Modi Dinner: पंतप्रधान मोदींसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करणार डिनर

डीएलएफने म्हटले आहे की, यातून देशातील प्रमुख शहरांमधील प्रीमियम फ्लॅट्सची मागणी दिसून येत आहे. एका आलिशान उच्चभ्रू गृहनिर्माण प्रकल्पात औपचारिक विक्री सुरू होण्यापूर्वीच 8,000 कोटी रुपयांच्या फ्लॅट्सची विक्रमी विक्री झाली आहे. असे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

हे सर्व फ्लॅट पाच टॉवरमध्ये बांधण्यात येणार आहेत

25 एकर प्रकल्पात कंपनी पाच टॉवरमध्ये 1,137 4BHK अपार्टमेंट बांधणार आहे. प्रत्येक टॉवर 38-39 मजल्यांचा असेल. हा प्रकल्प गोल्फ कोर्स एक्स्टेंशन, सेक्टर 63, गुरुग्राम येथे आहे. डीएलएफने सांगितले की हा प्रकल्प लॉन्च झाल्यापासून तीन दिवसांत यातील सर्व फ्लॅट विकले गेले आहेत.

Gurugram DLF Project File Photo
Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींचा मुंबईत भरणार दरबार; अंनिस अन् कॉंग्रेसने दर्शवला विरोध

नोएडामध्ये काल 250 कोटींची जमीन विकली गेली

दरम्यान, बुधवारी रियल्टी कंपनी M3M इंडियाने उत्तर प्रदेशातील नोएडा येथे 250 कोटी रुपयांना तीन एकर जमीन खरेदी केली होती. कंपनी येथे रिटेल आणि स्टुडिओ अपार्टमेंट प्रकल्प विकसित करण्यासाठी अतिरिक्त 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

नोएडाच्या सेक्टर 72 मध्ये असलेल्या या प्रकल्पाच्या विकासासाठी कंपनी एकूण 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. M3M गुरुग्रामच्या प्रॉपर्टी मार्केटमधील एक प्रमुख खेळाडू, 2022 मध्ये नोएडामध्ये दाखल झाला आणि आता उत्तर प्रदेशमध्ये वेगाने विस्तार करण्याचा मानस आहे.

एम3एम इंडियाने सांगितले की, त्यांनी नोएडा अधिकाऱ्यांनी केलेल्या ई-लिलावात तीन एकर जमीन खरेदी केली आहे. जमिनीची खरी किंमत 180 कोटी रुपये आहे, परंतु नोंदणी शुल्क आणि भाडेपट्ट्याचे शुल्क मिळून ही किंमत 250 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com