या अँड्रॉइड मोबाइलमध्ये 1 नोव्हेंबरपासून WhatsApp चालणार नाही

व्हॉट्सअॅपने जाहीर केलेल्या अँड्रॉइड फोन्समध्ये सॅमसंग, एलजी, झेडटीई, हुआवेई, सोनी,अल्काटेल यासारखे अनेक मोबाइलचा समावेश आहे.
WhatsApp will be shut down for these Android, iPhone devices from November
WhatsApp will be shut down for these Android, iPhone devices from November Dainik Gomantak
Published on
Updated on

अनेकांच्या मोबाइलमध्ये (Mobile) व्हॉट्सअ‍ॅप आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तिपर्यंत सर्वजणांना व्हॉट्सअ‍ॅपबद्दल (WhatsApp) माहिती आहे. पण 1 नोव्हेंबरपासून आता काही अँड्रॉइड मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. कारण म्हणजे या अँड्रॉइड ( (Android) मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सेवा देणे बंद करणार आहे. यामुळे तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा अजून कोणाला सुद्धा मॅसेज, फोटो(Photo) , व्हिडिओ (Video) पाठवू शकणार नाही .

प्लॅटफॉर्मच्या FAQ आणि ioSच्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅप 1 नोव्हेंबरपासून अॅन्ड्रॉईड 4.0.3 Cream Sandwich, ios9 आणि KaiOS 2.5.0. या सिस्टममध्ये काम करणे बंद करणार आहे. व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे की OS 4.1 आणि नवीन चालणाऱ्या Android डिव्हाइससाठी आणि सत्यापन प्रक्रियेदरम्यान फोन, एसएमएस किंवा कॉल प्राप्त करण्यास सक्षम असल्यास व्हॉट्सअॅप आपली सेवा देणार.

WhatsApp will be shut down for these Android, iPhone devices from November
आर्यन खान प्रकरणात ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची एन्ट्री, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

1 नोव्हेंबर 2021 पासून OS 4.0.4 आणि त्याहून अॅन्ड्रॉईड फोनला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, अशी माहिती देवून FAQविभाग वापरकर्त्यांना समर्थित डिव्हाइसवर स्विच करून आपली चॅट सेव्ह करून ठेवावे सांगितले आहे. आयफोनवापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले आहे की ios 10 किंवा नवीन आवृत्ती असणे आवश्यक आहे. कंपनीने जाहीर केलेल्या अँड्रॉइड फोनच्या यादीत सॅमसंग, एलजी, झेडटीई, हुआवेई, सोनी, अल्काटेल यासारख्या अनेक मोबईलचा समावेश आहे. हे फोन मॉडेल अॅपशी विसंगत असतील तर यामध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही असे अहवालात सांगितले आहे.

* तुमचा फोन सुसंगत आहे की नाही कसा पाहाल

तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असल्यास, त्यांच्या सेटिंग्ज मेनुवर जावे आणि नंतर तुमचा स्मार्टफोन चालू असलेली अँड्रॉइड आवृत्ती पाहण्यासाठी About Phone यावर क्लिक करावे. सर्व आयफोन वापरकर्ते ज्यांना ऑपरेटिंग सिस्टम त्यांचे स्मार्टफोन मॉडेल चालू आहे ते तपासायचे आहे त्यांनी सेटिंग्जमध्ये जावे आणि नंतर जनरल अँड इन्फॉर्मेशन पर्यायावर जावे. सॉफ्टवेअरवर क्लिक करावे आणि तुमचा आयफोन चालवत असलेली ऑपरेटिंग सिस्टम (OS) पाहण्यास सक्षम असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com