WhatsAppने दिली महिलांना भेट! लवकरच येतोय ‘Bol Behen’ चॅटबॉट App

कंपनीने खासकरून महिला वापरकर्त्यांना लक्षात घेऊन एक अतिशय खास फीचर सादर करण्याची घोषणा केली.
WhatsApp Chatbot App News, Bol Behen Chatbot App News, WhatsApp news Features
WhatsApp Chatbot App News, Bol Behen Chatbot App News, WhatsApp news FeaturesDainik Gomantak
Published on
Updated on

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी वेळोवेळे वेगळं काही तरी आणत असतो. पण यावेळी कंपनीने खासकरून महिला वापरकर्त्यांना लक्षात घेऊन एक अतिशय खास फीचर सादर करण्याची घोषणा केली. कंपनीने भारतीय महिलांसाठी AI आधारित चॅटबॉट आणला आहे ज्याला ‘बोल बेहेन’ असे नावही देण्यात आले आहे. यासाठी कंपनीने ‘नॉन-प्रॉफिट गर्ल इफेक्ट’ सोबत भागीदारी केल्याचे दिसून येत आहे. (WhatsApp gives gifts to women Coming soon Bol Behen Chatbot App)

WhatsApp Chatbot App News, Bol Behen Chatbot App News, WhatsApp news Features
योगी सरकारचे मंत्री म्हणाले; मदरशांमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत आहे!

कसं असेल हे चॅटबॉट अॅप?

नॉन-प्रॉफिट गर्ल इफेक्टसोबत भागीदारी केल्यानंतर, व्हॉट्सअॅपने भारतीय महिला आणि तरुण मुलींसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित चॅटबॉट ‘बोल बेहेन’ लॉन्च करण्याची घोषणा केली. या चॅटबॉटवर महिलांना आरोग्यविषयक संपुर्ण माहिती मिळणार आहे. एवढेच नाही तर या चॅट फॉरमॅटची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, महिलांना आरोग्य, लैंगिकता आणि नातेसंबंध या बद्दलच्या विषयांची माहिती येथे मिळू शकेल. हा चॅटबॉट एका खास भाषेमध्ये जसेकी हिंग्लिश म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या मिश्रणाने तयार करण्यात आला आहे. (Bol Behen Chatbot App News)

‘या’ नंबरवर करा मेसेज

तुम्हालाही बोल बेहेन चॅटबॉट वापरून कोणतीही माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला +91-7304496601 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर या नंबरवर Hi चा संदेश पाठवा. विशेषत: भारतातील हिंदी पट्ट्यातील किशोरवयीन मुली तसेच महिलांना लक्षात घेऊन हा चॅटबॉट सादर करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. जे सहसा लोडेड एंड स्मार्टफोन जास्त प्रमाणात वापरतात. याद्वारे महिलांना अनेक महत्त्वाची माहिती सहजरित्या मिळू शकणार आहे.

WhatsApp Chatbot App News, Bol Behen Chatbot App News, WhatsApp news Features
इस्रो शास्त्रज्ञाच्या पत्नीनेच रचला 25 लाख लुटण्याचा कट, काय आहे प्रकरण

चॅटबॉट कश्या प्रकारे करते काम?

व्हॉट्सअॅपवर बोल बेहेन चॅटबॉट मर्यादित वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आला आहे आणि ते सध्या फक्त बीटा आवृत्तीवर वापरला जाऊ शकणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे बोल बेहेन चॅटबॉट मोबाईल आणि वेब दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध असणार आहे. ते वापरण्यासाठी चॅटबॉकचा नंबर सेव्ह केल्यानंतर त्या नंबरवर हायचा मेसेज तुम्हाला पाठवावा लागेल. ज्यानंतर उत्तर येताच तुम्हाला महिलांशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहजरित्या मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com