योगी सरकारचे मंत्री म्हणाले; मदरशांमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत आहे!

'आता असे शिक्षण मदरशांमध्ये दिले जाईल ज्यामुळे राष्ट्रवादाची भावना वाढेल'
madrasa
madrasadainik gomantak
Published on
Updated on

लखनऊ : काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या योगी सरकारच समोर वादात सापडण्याचे संकेत मिळत आहे. त्यांचेच मंत्री वाद निर्माण होतील असे वक्तव्य करताना दिसत असून आता योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री धरमपाल सिंह यांनी मदरशांच्या शिक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. धरमपाल सिंह यांनी यूपीच्या मदरशांमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देणारे शिक्षण दिले जाते, असं म्हटलं आहे. मदरशांच्या शिक्षण पद्धतीतील बदलाबाबत बोलताना धरमपाल शनिवारी म्हणाले, आता असे शिक्षण मदरशांमध्ये दिले जाईल ज्यामुळे राष्ट्रवादाची भावना वाढेल आणि दहशतवाद पसरवणाऱ्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार नाही. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. (Uttar Pradesh’s Minority Affairs Minister Dharampal Singh has raked up a controversy statement on madrasa)

उत्तर प्रदेश 2022 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) आंवलाची जागा जिंकणारे धरमपाल सिंह म्हणाले की, आता यूपीमधील मदरसा शिक्षणाचा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित असेल. तर मदरसे हे भारतातील शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत. याचे पहिले कारण म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या मुस्लीम (Muslim) लोकसंख्या शिक्षणात विषम प्रमाणात मागासलेली आहे. या संस्थांना आर्थिक आव्हानाचा सामना करावा लागत आहे आणि त्यात सुधारणांची गरज आहे.

madrasa
इस्रो शास्त्रज्ञाच्या पत्नीनेच रचला 25 लाख लुटण्याचा कट, काय आहे प्रकरण

यापुढे सिंह म्हणाले, अभ्यासक्रमात वैज्ञानिकआणि धर्मनिरपेक्ष विषयांचा अभाव आहे आणि पदवीनंतर रोजगार मिळणे कठीण आहे. त्यामुळे मदरसा शिक्षणाचा (education) अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित असेल. तर वक्फ मालमत्तेवरील बेकायदेशीर अतिक्रमणे काढून टाकली जातील, जेणेकरून त्यांचा अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी वापर करता येईल, असेही मंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com