H3N2 इनफ्लुएंझा म्हणजे काय अन् कोणत्या वयोगटातील व्यक्तींनी घ्यावी खबरदारी

H3N2: H3N2 ची लक्षणे कोरोणासारखीच असल्याने चिंतेत भर पडली आहे.
 H3N2
H3N2Dainik Gomantak
Published on
Updated on

H3N2 : कोव्हीडची महामारी जात असल्याचे दिसत असतानाच आता इनफ्लुएंझा ए सबटाइपच्या H3N2 व्हायरस परसत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR ) ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन- तीन महिन्यापासून आता इनफ्लुएंझा ए सबटाइपच्या H3N2 व्हायरसमुळे सर्दी -खोकला असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

महत्वाचे म्हणजे, H3N2 ची लक्षणे कोरोणासारखीच असल्याने चिंतेत भर पडली आहे. या व्हायरसमुळे आजारी पडल्यानंतर यातून पूर्ण बरे होण्यासाठी 2 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याचे म्हटले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने म्हटल्यानुसार, वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी खोकला ताप वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र वातावरणात बदल होऊन आजारी पडले असल्यास दोन ते तीन दिवसात ताप कमी जातो.

आता हे प्रमाण दोन ते तीन आठवड्यापर्यत राहत असल्याचे दिसून येते. याबरोबरच, प्रदूषणामुळे 15 वर्षापेक्षा कमी आणि 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना श्वासनलिकेतून संक्रमण होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.

इनफ्लुएंझाचा अर्थ काय ?

जागतिक आरोग्य संघटनेचा ( WHO ) ने दिलेल्या माहितीनुसार, हवामानबदलामुळे होणाऱ्या इनफ्लुएंझाचे चार प्रकार आहेत. A, B, C, D असे हे प्रकार असल्याचे दिसून येते. यातील ए आणि बी या प्रकारतून ऋतू बदलल्यावर आजारी पडण्याचे प्रमाण वाढते.

दरम्यान, इनफ्लुएंझा A टाइपला महामारीचे कारण मानले जाते. , इनफ्लुएंझा A चे H3N2 आणि H1N1 असे दोन प्रकार दिसून येतात.

तर दुसरीकडे, इनफ्लुएंझा टाइप B ला कोणतेही सबटाइप नसतात मात्र याचे लायनेज असू शकतात. टाइप C जास्त नुकसान पोहचवत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

 H3N2
SCO Meeting: मोठी बातमी! गोव्यात होणाऱ्या SCO बैठकीला उपस्थित राहण्यास पाकिस्तानचा नकार

H3N2 चा सर्वात जास्त धोका कोणाला ?

खरेतर हा इनफ्लुएंझा कोणालाही होऊ शकतो. मात्र काहीजणांना याचा धोका अधिक आहे.

1. गर्भवती महिला

2. 5 वर्षापेक्षा कमी वयाची मुले

3. वयस्कर व्यक्ती

4. आधीच कोणताही आजार असलेल्या व्यक्ती

H3N2 ची लक्षणे कोणती आहेत ?

1. श्वासोच्छवासाचा त्रास

2. सतत ताप येणे

3. छाती किंवा पोटदुखी

4. स्नायू दुखणे

5. अशक्तपणा आणि चक्कर येणे

6. जुन्या आजाराची पुनरावृत्ती

7. सर्दी आणि खोकला

कोरोना महामारीसारखाच H3N2 चा प्रसार वेगाने होत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com