Ghulam Nabi Azad: काँग्रेसमध्ये घरवापसीबाबत काय म्हणाले गुलाम नबी आझाद...

काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांची आझाद यांच्याशी चर्चा
Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi AzadDainik Gomantak
Published on
Updated on

Ghulam Nabi Azad: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना काँग्रेसमध्ये परत आणण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसात समोर आले होते. यासाठी खुद्द सोनिया गांधी यांच्या निकटच्या नेत्या अंबिका सोनी या आझाद यांच्याशी चर्चा करत असल्याचे सांगितले जात होते.

त्यांनी आझाद यांना राहुल गांधी यांच्याशी बोलण्याचे निमंत्रणही दिले. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचण्यापूर्वी ही संपूर्ण कवायत केली जात आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून 20 जानेवारी रोजी जम्मूत येणार आहेत. दरम्यान, या विषयावर आता खुद्द गुलाम नबी आझाद यांनीच आपले मत व्यक्त केले आहे.

Ghulam Nabi Azad
CRPF: दहशतवाद्यांचा बिमोड करणार महिला कमांडो सज्ज, सैन्य ऑपरेशनमध्ये...

आझाद यांनी काँग्रेसमध्ये पुनरागमन करण्याच्या अटकळींना पूर्णविराम दिला आहे. आपण काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करणार असल्याचे ऐकून आश्चर्य वाटल्याचेही आझाद यांनी शुक्रवारी सांगितले. दुर्दैवाने माझ्या पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांकडून अशा कथा रचल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आझाद यांनी ऑगस्टमध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. ऑक्टोबरमध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक आझाद पार्टीची घोषणा केली होती. तत्पुर्वी 52 वर्षे ते काँग्रेसशी संबंधित होते. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ या वर्षी संपला, त्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले नव्हते.

Ghulam Nabi Azad
Uma Bharti: 'भगवान राम अन् हनुमान हे भाजपचे कॉपीराइट...', भारतींच्या वक्तव्याने BJP अडचणीत

याशिवाय काँग्रेसमधील नाराज गट असलेल्या G23 मध्येही आझाद होते. त्यांनी पक्षनेतृत्वावर टीका केली होती. राहुल गांधींवर त्यांनी निशाणा साधला होता. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान गुलाम नबी आझाद यांनी भारतीय जनता पक्षाशी फक्त काँग्रेसच स्पर्धा करू शकते, असा दावा केला होता. आझाद यांनी असेही म्हटले होते की ते काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधात नाहीत. आझाद यांच्या वक्तव्यानंतर भारत जोडो यात्रेचे संयोजक दिग्विजय सिंह यांनी आझाद यांना यात्रेत सहभागी होण्याचे खुले आमंत्रण दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com