West Bengal Violence: बंगालमधील निवडणुका संपल्या, हिंसाचार नाही! निकालानंतर 6 ठार; मृतांचा आकडा 50 जवळ

West Bengal: मृतांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक लोकांनी या घटनेसाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे. पोलिसांच्या गोळीबारात हे लोक मारले गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
West Bengal Violence
West Bengal ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

West Bengal Violence During Elections: पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका संपल्या आहेत. पण हिंसाचार संपला नाही. निवडणुकीच्या निकालानंतर आणखी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मृतांचा आकडा 45 वर पोहोचला आहे.

11 जुलै रोजी रात्री दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) च्या दोन समर्थकांसह तीन जण ठार झाले. जिल्ह्यातील भांगर भागातील मतदान केंद्राजवळ ही घटना घडली. रझौल गाझी (23), हसन मोल्ला (27) आणि राजू मोल्ला (25) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी गोळी झाडली!

मृतांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक लोकांनी या घटनेसाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे. पोलिसांच्या गोळीबारात हे लोक मारले गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या आरोपांबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,

“आम्ही बरुईपूर उपविभागाचे पोलीस अधीक्षक आणि दक्षिण 24 परगणा जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतरच पोलिसांनी जमावावर गोळीबार केला की नाही याची खात्री करता येईल.

West Bengal Violence
Allahbad High Court: "लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत, एखाद्या महिलेची गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या मागणी नाकारणे म्हणजे..."

उर्वरित तीन मृत्यू

याशिवाय, 12 जुलै रोजी मालदा जिल्ह्यातील खेमपूर पंचायतीमध्ये एका टीएमसी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती.

असे म्हटले जाते की या भागात पक्षाची विजयी रॅली सुरू असताना काही लोकांनी तेथे बॉम्ब फेकले, ज्यामध्ये टीएमसी समर्थक तारिकुल शेख यांचा मृत्यू झाला.

दक्षिण 24 परगणा येथील रायदिघी भागात भाजप समर्थकांनी आणखी एक टीएमसी समर्थक बिप्लब हलदार यांची हत्या केली. मात्र, भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे.

याशिवाय 12 जुलै रोजी मुर्शिदाबादमधील एका रुग्णालयात काँग्रेस कार्यकर्ता राजेश शेखर यांचा मृत्यू झाला होता.

8 जुलै रोजी मतदान केंद्राबाहेर झालेल्या हिंसाचारात 28 वर्षीय राजेश शेखर जखमी झाले, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

West Bengal Violence
Bihar Crime: दोन बायका अन्...! बिहारमध्ये दोन पत्नींनी मिळून केली पतीची हत्या

कोणाला किती जागा मिळाल्या?

पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीची सत्ता पुन्हा एकदा आली आहे.

TMC ने ग्रामपंचायत निवडणुकीत 35,514 जागा जिंकल्या. भाजपने मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत चांगली कामगिरी करत 9,870 जागा जिंकल्या आहेत.

डावे पक्ष आणि काँग्रेसबद्दल बोलायचे झाल्यास, सीपीआय(एम) ने 3,005 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने 2,608 जागा जिंकल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीतही तृणमूल इतर राजकीय पक्षांपेक्षा खूप पुढे होते.

ममता यांच्या पक्षाने जिल्हा परिषदेत 823 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला केवळ 26 जागा मिळाल्या असून आहेत. जिल्हा परिषदेत डाव्यांनी 2 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस 11 जागांवर विजयी झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com