West Bengal Crime: अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर निर्घुण हत्या, रात्रभर लोक शोधत राहिले; सकाळी...

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंज येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंज येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली.

शुक्रवारी याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी गुरुवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती.

शुक्रवारी सकाळी लोकांना तिचा मृतदेह कालव्यात तरंगताना आढळला. गुरुवारी सायंकाळी ही मुलगी क्लासला जाण्यासाठी घरातून निघाली होती.

'लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली'

वैतागलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा पोलिस (Police) मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोहोचले तेव्हा स्थानिकांनी त्या वेळी निषेध केला आणि दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी केली.

ते पुढे म्हणाले की, स्थानिकांनी रस्त्यावरील वाहतूक रोखली, टायर जाळले आणि पोलिसांवर दगडफेक केली.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.'

Crime News
West Bengal: डॉक्टरांचा निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर, जिवंत बाळाचे बनवले मृत्यू प्रमाणपत्र; कुटुंबीय...

'घटनेला पोलिस जबाबदार'

या घटनेचा संदर्भ देत, पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यात "अराजकता" वाढली असल्याचा आरोप केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या गुन्ह्यासाठी पोलिसांना "जबाबदार" धरले. पांढऱ्या चादरीने मृतदेह झाकलेला व्हिडिओ अधिकारी यांनी पोस्ट केला.

Crime News
West Bengal Viral News: धक्कादायक! तीन मुलांची आई मुलीला पाहण्यासाठी आलेल्या तरूणासोबत गेली पळून

'स्त्रिया किंमत चुकवत आहेत'

एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे बडे नेते आणि ममतांच्या निकवर्तीय असलेले सुवेंदू यांनी ट्विट केले की, 'पश्चिम बंगालमध्ये आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या.

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. सर्वसामान्यांना विशेषतः महिलांना याची किंमत मोजावी लागत आहे. राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांना बळ मिळत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com