पार्थ चॅटर्जींच्या अटकेनंतर Mamata Banerjee ची प्रतिक्रीया, जर कोणी दोषी असेल तर ...'

Mamta Govt: ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
 Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak

Mamata Banerjee On Partha Chatterjee: ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ममता म्हणाल्या की, 'मी भ्रष्टाचार किंवा कोणत्याही चुकीच्या कामाचे समर्थन करत नाही. जर कोणी दोषी आढळला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, परंतु माझ्याविरोधात चालवल्या जात असलेल्या दुर्भावनापूर्ण मोहिमेचा मी निषेध करते.'

दरम्यान, 'या प्रकरणातील सत्य बाहेर यावे पण मुदतीत.' तृणमूल काँग्रेस (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केंद्रीय संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्या पुढे म्हणाल्या, "जर भाजपला वाटत असेल की ते केंद्रीय एजन्सीचा वापर करुन माझा पक्ष फोडू शकतात, तर ते चुकीचे आहे."

 Mamata Banerjee
शिक्षक भरती घोटाळा: मंत्री पार्थ चॅटर्जींना दोन दिवसांची ED कोठडी

दुसरीकडे, कथित नोकरी घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शनिवारी पश्चिम बंगालचे उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली. एजन्सीने चॅटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जी हिलाही अटक केली आहे, जिच्या घरातून 21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 2014 ते 2021 पर्यंत राज्याचे शिक्षण मंत्री असलेले चटर्जी यांची या घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने (CBI) एप्रिल आणि मे महिन्यात चौकशी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com