राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी अ‍ॅक्शन मोडमध्ये !

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला आव्हान देण्याची योजना सुरु केली आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला आव्हान देण्याची योजना सुरु केली आहे. ममता दीदींनी शनिवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी संयुक्त रणनीती तयार करण्यासाठी 15 जून रोजी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. (Mamata Banerjee Called A Meeting Of 22 Opposition Parties Leader For Presidential Election)

दरम्यान, बॅनर्जी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, "राष्ट्रपतीपदाची निवडणूक लक्षात घेता 15 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लब, नवी दिल्लीत सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना भेटून भविष्यातील कृती आराखाड्यावर चर्चा करायची आहे.''

Mamata Banerjee
तारीख ठरली! 18 जुलैला होणार राष्ट्रपती पदाची निवडणुक

दुसरीकडे, टीएमसीने (TMC) जारी केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आल्याने, बॅनर्जींनी राष्ट्रीय राजधानीत संयुक्त बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षातील मुख्यमंत्री आणि नेत्यांशी संपर्क साधला आहे.

तसेच, राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येत असताना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. संयुक्त बैठकीत सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षातील मुख्यमंत्री आणि नेत्यांपर्यंत पोहोचत आहेत. भारताच्या राष्ट्रपतीसाठी मतदान 18 जुलैला होणार आहे. ज्यामध्ये इलेक्टोरल कॉलेजचे 4,809 सदस्य, खासदार आणि आमदार यांचा समावेश आहे, जे राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी मतदान करणार आहेत.

या नेत्यांनी ममता बॅनर्जींनी पत्र लिहिले

1. अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)

2. पिनाराई विजयन (मुख्यमंत्री, केरळ)

3. नवीन पटनायक (मुख्यमंत्री, ओडिशा)

4. कलवकुंतला चंद्रशेखर राव (मुख्यमंत्री, तेलंगणा)

5. थिरु एमके स्टॅलिन (मुख्यमंत्री, तामिळनाडू)

6. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)

7. हेमंत सोरेन (मुख्यमंत्री, झारखंड)

8. भगवंत सिंग मान (मुख्यमंत्री, पंजाब)

9. सोनिया गांधी (अध्यक्ष, काँग्रेस)

10. लालू प्रसाद यादव (अध्यक्ष, राजद)

11. डी. राजा (सरचिटणीस, सीपीआय)

12. सीताराम येचुरी (महासचिव, सीपीआयएम)

13. अखिलेश यादव (अध्यक्ष, समाजवादी पक्ष)

14. शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी)

15. जयंत चौधरी (राष्ट्रीय अध्यक्ष, RLD)

16. एचडी कुमारस्वामी (कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री)

17. एचडी देवेगौडा (खासदार, भारताचे माजी पंतप्रधान)

18. फारुख अब्दुल्ला (अध्यक्ष, JKNC)

19. मेहबूबा मुफ्ती (अध्यक्ष, पीडीपी)

20. एस. सुखबीर सिंग बादल (अध्यक्ष, शिरोमणी अकाली दल)

21. पवन चामलिंग (अध्यक्ष, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट)

22. के एम कादर मोहिद्दीन (अध्यक्ष, IUML)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com