गायक केके (KK) यांचे काल रात्री कोलकाता येथे निधन झाले. केके यांच्या मृत्यूचे कारण आधी हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात होते, तर आता त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे सांगितले जात आहे. केकेच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगितले. (KK Pass Away)
मुख्यमंत्री ममता यांनी ट्विट केले, "के.के.च्या आकस्मिक आणि अकाली निधनाने धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीयांना सर्व आवश्यक मदत पुरवली जावी यासाठी माझे सहकारी काल रात्रीपासून काम करत आहेत. त्यांच्याप्रती संवेदना."
या आधी भाजप नेते दिलीप घोष यांनी केके यांच्या मृत्यूवर पश्चिम बंगाल सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाले की, हा कार्यक्रम ज्या पद्धतीने आयोजित करण्यात आला तो योग्य नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे. शिवाय क्षमतेपेक्षा जास्त गर्दी आणि एसी बंद केल्याने त्यांची तब्येत का बिघडली की आणखी काही झाले, हे मला माहीत नाही.
हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी करताना पोलिस
पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस केकेच्या मृत्यूप्रकरणी आयोजक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. हा कार्यक्रम गुरुदास महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. गायक केके यांचे कुटुंबीय आज कोलकाता येथे आले आहेत. याप्रकरणी नवीन मार्केट पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगीतकाराचा मृत्यू शारिरीक आजाराने झाला की अन्य कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला. "KK म्हणून प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या गाण्यांमधून सर्व वयोगटातील लोकांच्या मनाला भिडलेल्या भावनांची विस्तृत श्रेणी दिसून येते. त्यांच्या गाण्यांमधून आम्ही त्यांची नेहमी आठवण ठेवू. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांसाठी शोक व्यक्त करतो. ओम शांती," पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.