KK Death: ओठांवर जखम, डोक्यावर खुणा... गायक केकेंच्या मृत्यूवरून सस्पेंस वाढला

Video मृत्यूपूर्वी KK ने गायले होते 'हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल...'
Singer KK
Singer KKTwitter
Published on
Updated on

केके या नावाने प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. नझरूल मंच येथे एका महाविद्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जेव्हा केके सुमारे एक तास गाऊन त्यांच्या हॉटेलवर परतले तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते. KKला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गायक केकेच्या शेवटच्या परफॉर्मन्सच्या अनेक झलक सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. कॉन्सर्ट दरम्यान केकेने,'हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल...'', 'आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल, तू जो मिला तो हो गया सब हासिल, नहीं कुछ भी, नहीं कुछ भी...' ही गाणी गायली.

Singer KK
संगीत रसिकांच्या हृदयावर राज्य करणारा आवाज नि:शब्द झाला

कॉन्सर्टचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

सोशल मीडियावर गायकाच्या निधनानंतर त्यांचे चाहते शोक व्यक्त करताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्याच्या शेवटच्या कॉन्सर्टचे व्हिडिओ सर्वाधिक पाहिले जात आहेत. केके यांच्या निधनाने बॉलिवूडला दु:ख झाले आहे. केके यांच्या निधनाबद्दल चित्रपट अभिनेता अक्षय कुमारपासून अनेक टेलिव्हिजन स्टार्सनी शोक व्यक्त केला.

53 वर्षीय केकेने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. काईट्स चित्रपटातील ‘जिंदगी दो पल की’, ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘आँखों में तेरी’, ‘बचना ए हसीनो’ चित्रपटातील ‘खुदा जाने’, ‘तडप तडप’ या चित्रपटातील गाण्यांनी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान, यांच्या निधनाबाबत कोलकातामध्ये सस्पेंस वाढला आहे. त्याच्या कपाळावर आणि ओठांवर जखमेच्या खुणा आढळल्या. यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस केकेच्या मृत्यूप्रकरणी आयोजक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. हा कार्यक्रम गुरुदास महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.

Singer KK
लोकप्रिय गायक KK यांना क्रीडा क्षेत्रातून श्रध्दांजली, वीरू,vvs लक्ष्मणने केले ट्विट

केकेचे कुटुंबीय आज कोलकाता येथे येत आहेत. याप्रकरणी नवीन मार्केट पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. KKचा मृत्यू शारिरीक आजाराने झाला की अन्य कोणत्या कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com