बंगाल हादरले! झोपेत असताना 'मच्छरदाणी फाडून'अपहरण, लैंगिक अत्याचारानंतर 4 वर्षांची चिमुकली आढळली गटाराजवळ

west bengal child assault case: पश्चिम बंगालच्या रेल्वे स्टेशनजवळ एका चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना
4 year old girl kidnapping
4 year old girl kidnappingDainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर रेल्वे स्टेशनजवळ एका चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शनिवारी (८ नोव्हेंबर) तारकेश्वर स्टेशनच्या आवारात, जिथे पीडित मुलीचे कुटुंब निवारा घेऊन राहत होते, तिथे ही घटना घडली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कुटुंबीयांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलगी झोपेत असताना आरोपीने तिची मच्छरदाणी फाडून तिला उचलून नेले.

रक्ताच्या थारोळ्यात, गटाराजवळ सापडली चिमुकली

पहाटेच्या वेळी मुलगी जागेवर दिसली नाही तेव्हा एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांनी तातडीने शोध सुरू केला. अनेक तासांच्या शोधानंतर, दुपारी चिमुकली स्टेशनजवळच्या एका गटाराजवळ रक्ताच्या थारोळ्यात आणि विवस्त्र अवस्थेत आढळली.

भाजपच्या आरामबाग जिल्हा सचिव परणा आदक यांनी सांगितले, "मुलगी तिच्या आजीजवळ मच्छरदाणीत झोपली होती, तेव्हा आरोपीने ती कापून तिला उचलून नेले. ती रक्ताच्या थारोळ्यात आणि विवस्त्र अवस्थेत आढळली. तिच्या गालावर चावल्याचे निशाण आहेत. अनेक तास उपचार करूनही तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव सुरू आहे."

पोलीस आणि डॉक्टरांवर निष्काळजीपणाचे आरोप

मुलीला तातडीने तारकेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला घरी पाठवले. मात्र, कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असतानाही रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली नाही. यानंतर, पीडितेचे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये गेले असता, तारकेश्वर पोलिसांनी त्यांना हाकलून लावल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या घटनेनंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांनी रुग्णालयाच्या आवारात घेराव घालून तीव्र आंदोलन केले. त्यांनी पोलीस आणि डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला.

'ममता बॅनर्जी अपयशी मुख्यमंत्री' - विरोधी पक्षनेते

बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी Xवर पोस्ट करत ममता बॅनर्जी यांना "अपयशी मुख्यमंत्री" म्हटले. अधिकारी म्हणाले, "तारकेश्वरमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाला आहे. कुटुंब पोलीस स्टेशनला धावले, पण एफआयआर नोंदवला गेला नाही! रुग्णालयात नेले, तर त्यांना चंदननगरला रेफर करण्यात आले.

तारकेश्वर पोलीस गुन्हा दडपण्यात व्यस्त आहेत. हेच ममता बॅनर्जी यांच्या 'फ्री-फॉर-ऑल' राजवटीचे खरे रूप आहे. एका निष्पाप चिमुकलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, तरीही पोलीस सत्य दडपून राज्याची बनावट कायदा-सुव्यवस्थेची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पोलीस अधिकारी आहेत की ममता बॅनर्जींचे चमचे? तारकेश्वर पोलीस त्यांच्या कायद्याचे रक्षण करण्याच्या शपथेला विसरले आहेत. ममता बॅनर्जी, तुम्ही अपयशी मुख्यमंत्री आहात."

4 year old girl kidnapping
Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

तृणमूल काँग्रेसकडून 'सुरक्षा अपयशाचा' बचाव

दुसरीकडे, तारकेश्वरचे आमदार आणि तृणमूल काँग्रेसचे नेते रामेंदू सिन्हा रॉय यांनी या घटनेला "अत्यंत खेदजनक" म्हटले आहे. मात्र, त्यांनी या परिसराची सुरक्षा रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने हे 'अपयश' रेल्वे पोलिसांचे असल्याचे म्हटले.

रॉय यांनी सांगितले की, वैद्यकीय उपचारांच्या गोंधळामुळे कुटुंबीय सुरुवातीला पोलीस ठाण्यातून परतले असावेत, परंतु प्रशासनाने नंतर सर्व आवश्यक वैद्यकीय व्यवस्था केली आहे. पोलिसांनी या घटनेसंदर्भात पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत एफआयआर (FIR) नोंदवला असून, पुढील तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com