Weekly Weather Update: भारतातील 'या' राज्यांमध्ये मान्सून होणार पुन्हा सक्रिय

दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये हवामान बदलत आहे.
Weekly Weather Update
Weekly Weather UpdateDainik Gomantak

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. भारतीय हवामान खात्यानुसार उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर, उत्तराखंडसह इतर राज्यांमध्ये हवामानामध्ये बदलत दिसून येत आहे. दिल्लीतही आजपासून 25 सप्टेंबरपर्यंत लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. 

दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांची हवामान स्थिती

राजधानी दिल्लीत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज ढगाळ वातावरण असले तरी काही भागात पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 24 अंशांपर्यंत राहू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत उद्यापासून संपूर्ण आठवडा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतातील राज्यांमध्ये चक्रीवादळ विरोधी प्रवाहामुळे पुढील 5 दिवस म्हणजे शनिवारपर्यंत काही राज्यांमध्ये पावसाची पूर्ण शक्यता आहे. राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर 21 सप्टेंबरपासून हवामानात बदल होणार आहे. 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत येथे पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, आज राजस्थानच्या बहुतांश भागात सूर्यप्रकाश दिसेल, तर उद्या ढगाळ वातावरण असेल. 

Weekly Weather Update
2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिल्लीतील 123 मालमत्ता वक्फ बोर्डाकडे कशा सोपवल्या?

हरियाणाच्या हवामानात बदल दिसून येतील

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पंजाबमध्ये (Panjab) हवामानात थोडासा बदल दिसून येईल. बहुतांश भागात ढगाळ वातावरण असेल मात्र अद्याप पावसाची शक्यता नाही. हरियाणातील हवामानात बदल दिसून येईल. आज ढगाळ वातावरण असेल तर उद्यापासून अनेक भागात पाऊस पडेल. हरियाणामध्ये किमान तापमान 23 अंशांपर्यंत राहील. उत्तर प्रदेशातील बहुतांश भागात या संपूर्ण आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, मुसळधार पाऊस अपेक्षित नाही. किमान तापमान 23 अंशांपर्यंत मोजले जाऊ शकते. 

जम्मू-काश्मीरमध्ये

जम्मू-काश्मीरच्या हवामानावर नजर टाकली तर इथलं हवामान रोज नवनवीन रूप धारण करत आहे. आज राज्याच्या बहुतांश भागात सूर्यप्रकाश दिसेल, तर उद्या आणि परवा ढगाळ वातावरण राहील. 22 सप्टेंबरला पुन्हा एकदा लोकांना उन्हाचा सामना करावा लागू शकतो, तर 23 ते 25 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये आजपासून 25 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 18 अंश तर किमान तापमान 8 अंशांपर्यंत राहू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com