Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

Navy Vice Chief Vice Admiral Sanjay Vatsayan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले.
Navy Vice Chief Vice Admiral Sanjay Vatsayan
Navy Vice Chief Vice Admiral Sanjay VatsayanDainik Gomantak
Published on
Updated on

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर भारताकडून वेळोवेळी ऑपरेशन सिंदूर सुरुच असल्याचे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यायन यांनी 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) संदर्भात मोठे आणि महत्त्वाचे वक्तव्य केले. नौदलाच्या सज्जतेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय नौदल 'ऑपरेशन सिंदूर'साठी पूर्णपणे सज्ज आणि तैनात आहे.

'ऑपरेशन सिंदूर'ची सज्जता

व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा महत्त्वाचा संदेश दिला. ते म्हणाले, "भारताची (India) रणनीती आणि योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही. आम्ही 'ऑपरेशन सिंदूर'साठी तयार आहोत." पुढे त्यांनी हेही स्पष्ट केले की, या महत्त्वाच्या ऑपरेशनच्या तयारीसोबतच नौदलाच्या इतर योजना, विविध युद्धाभ्यास आणि परदेशी देशांसोबतची भागीदारी देखील सुरुच राहणार आहे. हा एक अतिशय सरळ आणि स्पष्ट संदेश आहे, असे त्यांनी सांगितले.

Navy Vice Chief Vice Admiral Sanjay Vatsayan
Operation Sindoor: "एफ-16, जेएफ-17 सह पाकिस्तानची 10 विमानं पाडली" ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा Watch Video

हिंद महासागरात परदेशी शक्तींची वाढती उपस्थिती

यावेळी व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांनी हिंद महासागर क्षेत्रात वाढलेल्या बाह्य प्रादेशिक शक्तींच्या उपस्थितीवर चिंता व्यक्त केली, पण त्याचवेळी नौदलाच्या तयारीवर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, या भागात परदेशी शक्तींची उपस्थिती आधीपासूनच होती, पण आता ती सातत्याने वाढत आहे. "कोणत्याही क्षणी या महत्त्वाच्या समुद्री क्षेत्रात 40 ते 50 हून अधिक विदेशी जहाजे सक्रिय असतात," अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.

प्रत्येक जहाजावर भारतीय नौदलाची बारीक नजर

हिंद महासागरातील वाढत्या परदेशी उपस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे आश्वासन व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांनी दिले. भारतीय नौदल (Indian Navy) प्रत्येक जहाजावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. ते म्हणाले, "कोण कधी येते, कधी जाते, काय करत आहे आणि भविष्यात काय करणार आहे, या प्रत्येक हालचालीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवत आहोत आणि तिचे निरीक्षण करत आहोत."

Navy Vice Chief Vice Admiral Sanjay Vatsayan
Operation Sindoor: भारताने अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला... 'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा मोठा खुलासा VIDEO

एकूणच, व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यायन यांच्या या वक्तव्यावरु हे स्पष्ट होते की, भारतीय नौदल 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून आपली सागरी सुरक्षा आणि सज्जता उच्च पातळीवर ठेवून आहे. हिंद महासागरात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी तसेच भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी नौदल पूर्णपणे तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com