Watch Video Woman Driving E-Rickshaw Beats Traffic Policeman With Slippers: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला वाहतूक पोलिसाला मारहाण करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ई-रिक्षा चालवणाऱ्या महिलेविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तिला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी गाझियाबाद (Ghaziabad) शहरात जाम होता. यावेळी रस्त्यावर नंबर प्लेट नसलेली ई-रिक्षा उभी होती, ती मिथिलेश नावाची महिला चालवत होती. जाममुळे हेड कॉन्स्टेबल दिलीप कुमार यांच्यासह घटनास्थळी तैनात वाहतूक पोलिस विजयकांत सिंह यांनी महिलेला ई-रिक्षा रस्त्यावरुन हटवण्यास सांगितले, असा आरोप आहे.
दरम्यान, ई-रिक्षा हटवण्यास सांगितल्यानंतर मिथिलेश पोलिसांवर चिडल्याचा आरोप आहे. तिने पोलिस कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने पोलिस कर्मचाऱ्याचा वायरलेस सेट हिसकावून तो रस्त्यावर फेकून तोडल्याचा आरोप आहे.
अतिरिक्त डीसीपी (वाहतूक) रामानंद कुशवाह यांनी या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, आरोपी महिला चालक मिथिलेशने केवळ मारहाणच केली नाही तर पोलीस कर्मचाऱ्याशी अपशब्द वापरले.
कुशवाह म्हणाले की, महिलेच्या गैरवर्तनानंतरही ट्रॅफिक एसआय विजयकांत सिंह आणि हेड कॉन्स्टेबल दिलीप कुमार यांनी घटनास्थळी एकही महिला पोलीस नसल्यामुळे तातडीने कारवाई केली नाही.
त्यांनी सांगितले की, ई-रिक्षा चालवणाऱ्या महिलेविरुद्ध (Women) आयपीसी कलम 332 आणि कलम 353 तर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.