Watch Video: पंतप्रधान मोदी पोहचताच 'भारत माता की जय'च्या घोषणांनी दणाणले दुबई

PM Modi यांच्या स्वागतासाठी पगडी घातलेली एक व्यक्ती आली होती, मोदींनी विचारले की, तुम्ही पुण्याचे का? तो व्यक्ती म्हणाला पंतप्रधानांनी आमची पगडी ओळखली, ही अभिमानाची बाब आहे.
'Bharat Mata Ki Jai' slogans shook Dubai as soon as Prime Minister Modi arrived.
'Bharat Mata Ki Jai' slogans shook Dubai as soon as Prime Minister Modi arrived.Dainik Gomantak
Published on
Updated on

Watch Video, 'Bharat Mata Ki Jai' slogans shook Dubai as soon as Prime Minister Modi arrived:

28 व्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP28) परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री दुबईत दाखल झाले. दुबई विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान मोदी आज होणाऱ्या COP28 च्या जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदी दुबई विमानतळावर उतरताच, हॉटेलबाहेर थांबलेल्या भारतीय डायस्पोरामधील उत्साही सदस्यांनी 'सारे जहाँ से अच्छा' हे गाणे गायले आणि 'भारत माता की जय' तसेच 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या.

जेव्हा पंतप्रधान मोदी हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा भारतीय समुदायाचे लोक पीएम मोदींची एक झलक पाहण्यासाठी हॉटेलबाहेर आधीच उपस्थित होते.

हॉटेलबाहेर अनिवासी भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. त्यांनी सांस्कृतिक नृत्ये सादर केली. भारतीय समुदायातील लोकांनी 'मोदी-मोदी', 'अब मोदी सरकार' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या.

पंतप्रधान मोदींनीही उत्साहाने हस्तांदोलन करून या स्वागताचे स्वागत केले. आणि त्यांच्याशी संवादही साधला. संपूर्ण परिसर मोदी-मोदी आणि भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याबद्दल आनंद व्यक्त करताना एका अनिवासी भारतीयाने सांगितले की, "मी 20 वर्षांपासून यूएईमध्ये राहत आहे. पण याआधी कधीच मिळाला नव्हता इतका आनंद मला पहिल्यांदाच मिळाला आहे. माझ्या जवळचे कोणीतरी इथे आहे असे वाटते. मी जितका आनंद व्यक्त करू शकतो तितका कमी आहे."

आणखी एका सदस्याने सांगितले की, "आमच्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. आम्ही खूप आनंदी आहोत. पंतप्रधान मोदींनी माझ्याशी हस्तांदोलन केले. माझ्यासोबत त्याने इतर लोकांशीही हस्तांदोलन केले. मी खूप आनंदी आहे."

पीएम मोदींच्या स्वागतासाठी पगडी घातलेली एक व्यक्ती आली होती, ज्याला पंतप्रधान मोदींनी विचारले की, तुम्ही पुण्याचे आहात का? तो व्यक्ती म्हणाला पंतप्रधानांनी आमची पगडी ओळखली, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

'Bharat Mata Ki Jai' slogans shook Dubai as soon as Prime Minister Modi arrived.
Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबईत दाखल, गळाभेट घेत UAEच्या उप पंतप्रधानांनी केलं स्वागत
'Bharat Mata Ki Jai' slogans shook Dubai as soon as Prime Minister Modi arrived.
चीनला पछाडत 'या' क्षेत्रात भारताची बाजी, मिळवले अव्वल स्थान

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आपला अनुभव शेअर केला. लोकांचा उत्साह आणि प्रेम पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, 'त्यांचा पाठिंबा आणि उत्साह ही आमच्या दोलायमान संस्कृतीचा आणि दृढ संबंधांचा पुरावा आहे. दुबईत भारतीय समुदायाने केलेले स्वागत पाहून मी खूप प्रभावित झालो आहे.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी (PM Modi) या परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीहून निघाले होते आणि भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा दुबईतील अल मकतूम विमानतळावर पोहोचले होते, तेथे त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या सकाळी उच्च-स्तरीय हवामान कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमांसोबत असतील आणि पंतप्रधान त्यांचे भाषण करतील. त्यानंतर, ते UAE द्वारे क्लायमेट फायनान्सच्या संक्रमणावर आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com