PM Security Breach
PM Security BreachDainik Gomantak

PM Modi Security Breach: पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी ७ पोलीस अधिकारी निलंबित

PM Modi Security Breach: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
Published on

PM Modi Security Breach: 5 जानेवारी 2022 ला पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी दिसून आली होती. आता या प्रकरणात मोठी कारवाई केली गेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी 7 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये भटिंडा एसपी गुरबिंदर सिंग, डीएसपी परसन सिंग, डीएसपी जगदीश कुमार, इन्स्पेक्टर तेजिंदर सिंग, इन्स्पेक्टर बलविंदर सिंग, इन्स्पेक्टर जतिंदर सिंग आणि एएसआय राकेश कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.

पंजाबच्या गृहविभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सध्या भटिंडा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सिंग यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

 PM Security Breach
North Bengal: ''पश्चिम बंगालपासून वेगळे राज्य हवे...''; गोरखा, आदिवासींसह अनेक गट आले एकत्र

फिरोजपूरमध्ये ५ जानेवारी २०२२ रोजी आंदोलकांनी केलेल्या नाकेबंदीमुळे पंतप्रधान मोदींचा ताफा फ्लायओव्हरवर अडकला होता. यानंतर ते रॅली आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित न राहता पंजाबहून दिल्लीला परतले. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

निलंबनाच्या आदेशानुसार, 18 ऑक्टोबर 2023 रोजी या घटनेचा अहवाल पोलीस महासंचालकांनी सादर केला होता, ज्यामध्ये राज्य पोलीस प्रमुखांनी की सिंग यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरित्या बजावले नसल्याचे सांगितले होते. सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने यापूर्वी अनेक राज्य अधिकाऱ्यांना या त्रुटीसाठी जबाबदार धरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com