Virat Kohli: दोन डकनंतर कोहलीचा पलटवार, सचिनचा 'सर्वात मोठा विक्रम' मोडत बनला व्हाईट-बॉलचा king

Virat Kohli Record: सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या टीकांना सडेतोड उत्तर देत, कोहलीने शानदार पुनरागमन केले
India vs Australia ODI
India vs Australia ODIDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli breaks Sachin Tendulkar record: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताला ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळाला. या विजयाचे शिल्पकार ठरले कर्णधार शुभमन गिल (२४ धावा) बाद झाल्यावर मैदानात आलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा. सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या टीकांना सडेतोड उत्तर देत, कोहलीने शानदार पुनरागमन केले आणि रोहितसोबत १६८ धावांची अभेद्य भागीदारी रचली, ज्यामुळे भारताने २३७ धावांचे आव्हान सहज पार केले.

विराट कोहली ७४ धावांवर नाबाद राहिला, तर रोहित शर्माने आपल्या कारकिर्तेतील ५० वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. या मॅच-विनिंग खेळीदरम्यान कोहलीने एकाच वेळी अनेक मोठे विक्रम मोडीत काढले, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक ऐतिहासिक अध्याय जोडला गेला.

व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये सचिनचा विक्रम मोडला

विराट कोहलीने आपल्या या संयमी आणि निर्णायक खेळीदरम्यान सचिन तेंडुलकरचा व्हाईट-बॉल क्रिकेटमधील सर्वात मोठा धावसंख्या विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या व्हाईट-बॉल कारकिर्दीत (ODI + T20I) एकूण १८,४३६ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने आता या आकड्याला मागे टाकून १८,४६९ धावांसह व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला.

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू

व्हाईट-बॉलमधील विक्रमासोबतच कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटमधील आणखी एक मोठा टप्पा गाठला. त्याने श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकारा (१४,२३४ धावा) याला मागे टाकले आहे. १४,२५५ धावांसह विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर (१८,४२६ धावा) अजूनही पहिल्या स्थानावर आहे.

India vs Australia ODI
Rohit Sharma: सिडनीत 'हिटमॅन'चा डंका! शेवटच्या सामन्यात रचला इतिहास, सचिन-विराटच्या 'एलिट क्लब'मध्ये कोरलं नाव

पाठलाग करताना सर्वाधिक ५०+ स्कोअर

विराट कोहलीने पाठलाग करताना ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीतही सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. एकदिवसीय सामन्यांमध्ये पाठलाग करताना कोहलीचा हा ७०वा ५०+ स्कोर ठरला. त्याने सचिन तेंडुलकरच्या ६९ अशा खेळींचा विक्रम मोडत आता या चार्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. कोहलीसाठी हा विजय आणि विक्रम आगामी २०२७ एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहेत.

'प्लेअर ऑफ द सिरीज' रोहित शर्मा

याच सामन्यात शतक आणि ॲडलेडमधील अर्धशतकाच्या जोरावर रोहित शर्माला 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात हा पुरस्कार जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. या कामगिरीमुळे रोहितने निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला असून, २०२७ विश्वचषकासाठी आपला दावा भक्कम केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com