VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

Virat Kohli Daryl Mitchell viral video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगला आहे.
Virat Kohli Daryl Mitchell viral video
Virat Kohli Daryl Mitchell viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई करत शानदार शतक झळकावले. मात्र, मिचेल बाद होऊन माघारी परतत असताना मैदानावर एक असा प्रसंग घडला ज्याने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि डॅरिल मिचेल यांच्यातील 'मैत्रीपूर्ण' धक्काधुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आधी कौतुकाची थाप, मग धक्का!

डॅरिल मिचेलने १३१ चेंडूंमध्ये १३७ धावांची तुफानी खेळी केली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवने त्याचा अप्रतिम झेल घेतला. मिचेल बाद होऊन पॅव्हेलियनकडे जात असताना सीमारेषेवर विराट कोहली उभा होता.

विराटने प्रथम टाळ्या वाजवून मिचेलच्या खेळीचे कौतुक केले आणि त्याला सन्मान दिला. मात्र, मिचेल जवळ येताच विराटने हसत-हसत त्याला गमतीत धक्का देऊन मैदाबाहेर जाण्याचा इशारा केला. विराटची ही खोडकर मस्करी पाहून मिचेललाही हसू आवरले नाही. प्रतिस्पर्धी खेळाडू असूनही दोघांमधील ही खिलाडूवृत्ती चाहत्यांना भावली आहे.

Virat Kohli Daryl Mitchell viral video
Goa Airline Incentive Scheme: गोव्यात विमान कंपन्यांना मिळणार 'बुस्टर डोस'! नवीन मार्गांसाठी तगडं अनुदान; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 'एअरलाईन इन्सेन्टिव्ह' योजना

मिचेल आणि फिलिप्सच्या शतकांनी भारतासमोर धावांचा डोंगर

कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. डॅरिल मिचेलच्या १३७ धावांव्यतिरिक्त ग्लेन फिलिप्सनेही अवघ्या ८३ चेंडूत झंझावाती शतक ठोकत १०६ धावा केल्या.

या दोन शतकी खेळींच्या जोरावर न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३३७ धावांचा डोंगर उभा केला. अखेरच्या षटकांत मायकल ब्रेसवेलने १८ चेंडूत नाबाद २८ धावांचे योगदान दिले.

Virat Kohli Daryl Mitchell viral video
Goa Ranji Cricket: गोवा क्रिकेटसाठी महत्वाची बातमी! 'हा' धाकड खेळाडू परतला रणजी संघात, चौघांना वगळले; वाचा संपूर्ण यादी..

भारतीय गोलंदाजीची स्थिती

भारतीय गोलंदाजांसाठी आजचा दिवस खडतर ठरला. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले असले, तरी त्यांनी मोठ्या प्रमाणावर धावा मोजल्या. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १ बळी मिळवण्यात यश आले.

आता ३३८ धावांचे विशाल लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करावी लागणार असून, सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या कामगिरीवर खिळल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com