Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

T20 Asia Cup Centuries: आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा एकूण आठ संघ यात सहभागी होत आहेत.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

T20 Asia Cup Centuries: आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. पुढील वर्षी टी20 विश्वचषक (T20 World Cup) होणार असल्याने यंदाचा आशिया कपही टी20 फॉरमॅटमध्ये खेळला जाईल. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, टी20 आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोनच फलंदाजांनी शतके झळकावली आहेत. यंदाच्या स्पर्धेत तिसरे शतक पाहायला मिळते का, याची क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

टी20 फॉरमॅटमध्ये तिसऱ्यांदा आशिया कप

दरम्यान, पुढील वर्षी ज्या फॉरमॅटचा वर्ल्ड कप होणार असतो, त्याच फॉरमॅटमध्ये आशिया कप खेळला जातो. आशिया कपचा इतिहास जरी जुना असला तरी टी20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत केवळ दोनच वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टी20 विश्वचषकामुळे पहिल्यांदा 2016 मध्ये आणि त्यानंतर 2022 मध्ये आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये खेळला गेला होता. आता तिसऱ्यांदा टी20 आशिया कपचे आयोजन होत आहे.

Virat Kohli
Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

हॉंगकॉंगच्या बाबर हयातचे शानदार शतक

गेल्या काही वर्षांपासून टी20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट मोठ्याप्रमाणात खेळले जात आहे. त्यात भरपूर शतकेही पाहायला मिळत आहेत. पण टी20 आशिया कपमध्ये मात्र शतकांचा दुष्काळ आहे. 2016 मध्ये जेव्हा पहिल्यांदा टी20 आशिया कप झाला, तेव्हा हॉंगकॉंगचा स्टार फलंदाज बाबर हयातने ओमानविरुद्ध 60 चेंडूंमध्ये 122 धावांची जबरदस्त खेळी खेळली होती. टी20 आशिया कपच्या इतिहासातील हे पहिले शतक होते. विशेष म्हणजे त्या वर्षी त्यानंतर एकही शतक आले नव्हते.

Virat Kohli
Asia Cup 2025: आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, सूर्याकडे संघाची कमान; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

विराट कोहलीच्या नावावर दुसरे शतक

दरम्यान, या यादीतील दुसरे नाव भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचे आहे. 2022 मध्ये जेव्हा पुन्हा टी20 फॉरमॅटमध्ये आशिया कप झाला, तेव्हा कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूंमध्ये नाबाद 122 धावांची तूफानी खेळी खेळली होती. विशेष म्हणजे, कोहलीच्या टी20 आंतरराष्ट्रीय (T20 International) कारकिर्दीतील हे एकमेव शतक आहे, जे त्याने आशिया कपमध्येच झळकावले होते. अनेक वर्षांच्या शतकांच्या दुष्काळानंतर आलेले हे शतक त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी खूप खास होते.

आता क्रिकेट चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत की यंदाच्या आशिया कपमध्ये आणखी एखादा फलंदाज शतकी खेळी करुन या यादीत आपले नाव जोडतो का? की हे दोनच दिग्गज शतकांसह कायम राहतात, हे पाहणे रंजक ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com