Asia Cup 2025: आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, सूर्याकडे संघाची कमान; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Team India Squad For Asia Cup 2025: आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. या बहुराष्ट्रीय स्पर्धेसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.
Asia Cup 2025 Indian Cricket Team List
Team India Squad For Asia Cup 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2025 Team India Squad Announcement

बीसीसीआयने आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कपमध्ये खेळताना दिसेल. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबरपासून यूएईविरुद्ध होईल. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत.

आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे, ज्यामध्ये 15 खेळाडूंचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर शुभमन गिलची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. सूर्या संघाचा कर्णधार होईल हे आधीच माहित होते, परंतु त्याच्या उपकर्णधाराच्या नावाबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.

Asia Cup 2025 Indian Cricket Team List
Goa Tribal Reservation: आता दिल्लीकडे साऱ्यांचे लक्ष, ST राजकीय आरक्षणाचा मुद्दा; प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा

शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांच्यात उपकर्णधारपदासाठी स्पर्धा होती, ज्यामध्ये गिलची निवड करण्यात आली आहे. अलीकडेच शुभमनने इंग्लंड दौऱ्यावर चमकदार कामगिरी केली होती.

'या' खेळाडूंना मिळाली संधी

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हरिखेल राकेश (विकेटकीपर).

Asia Cup 2025 Indian Cricket Team List
Dhirio in Goa: ‘धीरयो’वरून सरकार पेचात! परंपरा की कायदा? आता न्‍यायालयात ‘कसोटी’

भारतीय निवडकर्त्यांनी मुख्य संघात फक्त ३ फिरकी खेळाडू ठेवले आहेत. त्यामुळे २ नावे स्टँडबायमध्ये दिसत आहेत. चांगल्या कामगिरीनंतरही वॉशिंग्टन सुंदरला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे.

सुंदर इंग्लिश संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेतही संघाचा भाग होता. त्याच वेळी, दुखापतीमुळे बराच काळ बाहेर असलेल्या रियान परागलाही स्टँडबाय खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे. तथापि, या सर्व खेळाडूंना मुख्य संघात तेव्हाच संधी मिळेल जेव्हा कोणी दुखापतीमुळे संघाबाहेर असेल.

ध्रुव जुरेलची यष्टीरक्षक म्हणून निवड

ध्रुव जुरेलची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. जुरेल पूर्वी मुख्य संघाचा भाग होता, परंतु जितेश शर्माने आयपीएल २०२५ मध्ये चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळालं.

8 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली

भारताने तब्बल 8 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. सुनील गावसकर यांच्यात नेतृत्वात पहिल्यांदा 1984 साली आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. भारताने त्यानंतर 1988, 1990, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 साली आशिया कप जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com