Viral Video: चल मेरे घोडे! पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा पाहून, झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ठोकली घोड्यावर मांड

Zomato Delivery Boy: एक अतिशय अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊन ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे.
Zomato Delivery Boy On Horse Hyderabad.
Zomato Delivery Boy On Horse Hyderabad.Dainik Gomantak

Zomato Delivery Boy On Horse Hyderabad: तेलंगणातील हैदराबादमध्ये असलेल्या चंचलगुडा परिसरातून एक अतिशय अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊन ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे.

रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला घोड्यावरून ऑर्डर पूर्ण करण्याचे कारण विचारले असता पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग असल्याचे त्या तरुणाने सांगितले. त्यामुळे त्याला पेट्रोल भरण्यास वेळ लागत आहे. परिणामी ग्राहकांच्या ऑर्डर्स वेळेत डिलिव्हर होत नव्हत्या. त्यामुळे त्याला घोड्यावरून डिलिव्हरी करणे योग्य वाटले.

हा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय गजबजलेल्या भागातून घोड्यावरून जाताना पाहूण रस्त्यावरील सगळेच लोक चक्रावून गेले.

व्हिडिओमध्ये, डिलिव्हरी बॉय एका प्रवाशाशी बोलताना ऐकला जाऊ शकतो. यामध्ये तो म्हणतो पंपामध्ये पेट्रोल संपल्यामुळे त्याने फूड डिलिव्हरीसाठी घोड्यावर जाण्याचा पर्याय निवडला.

काय झाले असे विचारल्यावर घोडेस्वार उत्तरला, "पेट्रोल नहीं मिला भाई. तीन घंटे लाइन मे खडा रहा. झोमॅटो से निकल गया..पेट्रोल नहीं मिला.

Zomato Delivery Boy On Horse Hyderabad.
Viral Video: काय लायकी आहे तुझी... साहेबांचा तोल ढासळला, लायकी नाही म्हणून तर... ट्रक ड्रायव्हरचेही सनसनीत उत्तर

नुकतेच केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणात नवीन तरतुदी लागू केल्या आहेत, ज्या अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.

मंगळवारी या कायद्याच्या विरोधात ट्रान्सपोर्ट असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आणि देशभरात ट्रक आणि बसेस संपावर गेल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Zomato Delivery Boy On Horse Hyderabad.
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्‍घाटना दिवशी 'या' राज्यात Dry Day, मुख्यमंत्र्यांची घोषणा

काही ठिकाणी खाद्यपदार्थांचा पुरवठा ठप्प झाला तर काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला.

त्याचवेळी संपाचे वृत्त समजताच अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मात्र, हा नवा कायदा लवकरच लागू होणार नसल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. झोमॅटो बॉयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com