Watch Video : 'आधार कार्ड असेल तरचं पाणीपुरी मिळेल' ! पाणीपुरी खाण्याआधी इथे दाखवावे लागेल आधार

Watch Video : आधार कार्ड दाखवल्यावरच पाणी पुरी मिळेल असे फलक लिहिलेला पाणीपुरीवाला तुम्ही कधी पाहिला आहे का? जर तुमचे उत्तर नाही असेल तर तुम्हाला या अप्रतिम व्हिडिओ ते पहायला मिळेल.
Aadhar Car For Panipuri
Aadhar Car For PanipuriDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात खाद्यप्रेमींची कमतरता नाही. त्यामुळेच खाद्यपदार्थांच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीची चव लक्षात घेऊन अधिकाधिक स्वादिष्ट खाद्यपदार्थ बाजारात येत राहतात. दुसरीकडे, आजकाल स्ट्रीट फूड विक्रेते देखील नवीन फ्लेवर्सच्या शोधात खाद्यपदार्थांवर प्रयोग करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची खाण्याची आवड जरी वेगळी असू शकते, पण एक गोष्ट आहे जी प्रत्येकाची आवडती आहे आणि ती म्हणजे पाणीपुरी, ज्यासाठी लोक तासंतास लांब रांगेत उभे असतात. अलीकडेच, व्हायरल झालेला पाणीपुरीशी   संबंधित असा एक व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि हसून हसून तुमचे पोट दुखल्याशिवाय रहाणार नाही.

पाणीपुरी खाण्यासाठी आधार कार्ड आवश्यक  

फुचका, पाणी के बताशे, गुपचूप आणि गोलगप्पा या नावाने ओळखल्या जाणार्‍या पाणीपुरीचा एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे. यामध्ये ज्या ग्राहकाकडे आधार कार्ड आहे त्यालाच पाणीपुरी दिली जात असल्याचे दिसत आहे. हा अप्रतिम इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आधार कार्ड असेल तरचं पाणीपुरी मिळेल.'

Aadhar Car For Panipuri
Bimal Patel : नव्या संसद भवनाचे शिल्पकार बिमल पटेल यांच्याबद्दल सर्वकाही एका क्लिकवर

सोशल मीडियावर मजेदार प्रतिक्रिया

व्हिडिओमध्ये फूड ब्लॉगर सांगत आहेत की येथे 6 पाणीपुऱ्यांची प्लेट 20 रुपयांना मिळते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे पाणीपुरी फक्त पुरुषांनाच खायला दिली जाते. व्हिडीओमध्ये कार्टवर लिहिलेले दिसत आहे की, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना पाणी पुरी खाऊ घातली जाणार नाही.

दुसरीकडे, पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार पाणीपुरीमुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.  व्हिडिओ पाहताना काही यूजर्स संताप व्यक्त करत आहेत, तर काही यूजर्स खूप एन्जॉय करत आहेत. व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या फनी कमेंट्स वाचायला मिळत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'ज्याला मरायचे आहे त्याने खा.'  

Aadhar Car For Panipuri
Snake In Mid Day Meal : किडे आणि सरड्यांनंतर आता माध्यान्ह भोजनात साप; 20 हून अधिक मुले रुग्णालयात दाखल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com