Bimal Patel : नव्या संसद भवनाचे शिल्पकार बिमल पटेल यांच्याबद्दल सर्वकाही एका क्लिकवर

New Parliament Building : बिमल हसमुख पटेल हे तीन दशकांहून अधिक अनुभव असलेले एक प्रसिद्ध वास्तुविशारद आहेत. ते शहरी रचना आणि नियोजनात तज्ञ मानले जातात. नवीन संसद भवनासह काशी विश्वनाथ कॉरिडॉर सारख्या देशात पूर्ण झालेल्या आणि चालू असलेल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांमागेही त्यांचे नाव आहे.
Bimal Patel
Bimal PatelDainik Gomantak
Published on
Updated on

Central Vista Project

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. हे बांधकाम सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गुजरातमधील ज्येष्ठ वास्तुविशारद बिमल पटेल यांनी संसदेच्या नवीन इमारतीची रचना केली आहे. देशात पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांमागेही त्यांचे नाव आहे. बिमल यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरची रचनाही केली आहे.

कोण आहेत बिमल पटेल?

बिमल हसमुख पटेल हे तीन दशकांहून अधिक अनुभव असलेले एक प्रसिद्ध वास्तुविशारद आहेत. ते शहरी रचना आणि नियोजनात तज्ञ मानले जातात. बिमल सध्या अहमदाबाद येथील सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजीचे (CEPT) अध्यक्ष आहेत. बिमल २०१२ पासून या विद्यापीठाचे नेतृत्व करत आहेत. यासह, ते एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​प्रमुख आहेत, ज्याची स्थापना त्यांचे वडील हसमुख सी पटेल यांनी 1960 मध्ये केली होती. हसमुख पटेल हे एक प्रख्यात वास्तुविशारद देखील होते ज्यांनी अनेक प्रतिष्ठित इमारतींची रचना केली.

अहमदाबादमधून शालेय शिक्षण

बिमल पटेल यांचे शालेय शिक्षण अहमदाबाद येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये झाले. बिमल यांनी 1984 मध्ये CEPT, अहमदाबाद येथून आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा मिळवला. त्यांनी 1988 मध्ये आर्किटेक्चरमध्ये मास्टर आणि सिटी प्लॅनिंगमध्ये मास्टर आणि 1995 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून शहर आणि प्रादेशिक नियोजनात पीएचडी प्राप्त केली. बिमल 1990 मध्ये वडील हसमुख पटेल यांच्या कंपनीत रुजू झाले. 1996 मध्ये, बिमलने पर्यावरण नियोजन सहयोगी (EPC) ही ना-नफा सल्लागार आणि धोरण-संशोधन संस्था स्थापन केली.

डिझायनिंग क्षेत्रातील मोठे नाव, पद्मसह अनेक पुरस्कारांनी सन्मान

डॉ. बिमल पटेल यांनी आपल्या कार्यातून अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्यांचे कार्य आणि त्यांच्या प्रकल्पांना आगा खान आर्किटेक्चर पुरस्कार (1992), वर्ल्ड आर्किटेक्चर अवॉर्ड (1997), यूएन सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट्स अवॉर्ड ऑफ एक्सलन्स (1998), आर्किटेक्चर रिव्ह्यू हाय कमंडेशन अवॉर्ड (2001) यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते शहरी नियोजन आणि डिझाइनमधील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्कार (2003) आणि HUDCO डिझाइन पुरस्कार (2013) देखील प्राप्तकर्ते आहेत. 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Bimal Patel
New Parliament Inauguration: नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, पाहा व्हिडिओ

संसद, राजपथ पुनर्विकासासाठी 229 कोटींचा करार

बिमल पटेल यांच्या HCP डिझाईन्सने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी सल्लागार बोली जिंकली. त्यांच्या फर्मला नवीन संसदेसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सल्लागार सेवांसाठी 229.75 कोटी रुपये दिले जातील. पटेल यांच्या फर्मने ऑफर केलेल्या सेवांमध्ये प्रकल्पासाठी मास्टर प्लॅन तयार करणे आणि त्यात समाविष्ट असलेल्या संरचनांचे डिझाइन, खर्चाचा अंदाज, वाहतूक एकत्रीकरण, पार्किंग सुविधा आणि लँडस्केप यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गेल्या वर्षी ही माहिती दिली होती.

Bimal Patel
New Parliament Inauguration: नव्या संसद भवनात धार्मिक एकतेचे दर्शन, Watch Video

या प्रकल्पांवर काम केले आहे

पटेल यांनी संपूर्ण भारतात निवासी, संस्थात्मक, व्यावसायिक, गृहनिर्माण, औद्योगिक आणि शहरी डिझाइन आणि शहरी नियोजन प्रकल्पांच्या श्रेणीवर काम केले आहे. बिमल यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये आगा खान अकादमी हैदराबाद, अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशन, भुज विकास योजना आणि नगर नियोजन योजना (भूकंपानंतर), सीजी रोड पुनर्विकास, कांकरिया तलाव विकास, साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि स्वर्णिम संकुल, उद्योजकता विकास संस्था, गुजरात उच्च न्यायालय, हिम्मतनगर कॅनॉलफ्रंट यांचा समावेश आहे. आयआयएम अहमदाबाद नवीन परिसर. याशिवाय बिमल यांनी प्रसिद्ध काशी विश्वनाथ कॉरिडॉरची रचनाही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com