Video: शिक्षकाच्या 'क्वार्टर' च्या प्रश्नाला विद्यार्थ्याचे भन्नाट उत्तर

हा व्हिडिओ (Viral Video) एका ऑनलाइन वर्गाचा आहे ज्यात एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाच्या प्रश्नाला केलेल्या विनोदी उत्तराने नेटिझन्समध्येच फूट पडली आहे.
Viral Video: Teacher asks question for quarter student horrible answer
Viral Video: Teacher asks question for quarter student horrible answerInstagram
Published on
Updated on

मागील बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी हे ऑनलाईन लेक्चर (Online Class) करत आहेत. या साऱ्या दिवसांत आपण या ऑनलाईन लेक्चर मधून अनेक किस्से घडून ते व्हायरल होतना सुद्धा पहिले आहेत. पण आता असा एक व्हिडिओ ऑनलाईन क्लासचा असा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे ज्याने सगळ्यांना पोट भरून हसायला भाग पाडले आहे. हा व्हिडिओ एका ऑनलाइन वर्गाचा आहे ज्यात एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाच्या प्रश्नाला केलेल्या विनोदी उत्तराने नेटिझन्समध्येच (Netizens) फूट पडली आहे.(Viral Video: Teacher asks question for quarter student horrible answer)

या व्हिडिओमध्ये, एडीनोवेटचे संस्थापक सदस्य सीए धवल पुरोहित (Dhaval Purohit) सीएच्या विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहेत आणि. "आप सबसे पहले ये समझिये की एक क्वार्टर मे कितना होता है. हेटविक बीटा बोल एक क्वार्टर में कितना होता है (प्रथम एक चतुर्थांश किती आहे हे समजून घ्या. हेटविक, मला सांगा की एक चतुर्थांश किती आहे)," पुरोहित विचारतात.

आता यावर एका विद्यार्थाने भन्नाट असे उत्तर दिले आहे तो लिहितो की एका क्वाटर मध्ये 30 ml असतं. आणि चिडलेले पण हसत शिक्षक त्याला म्हणतात 'अर्रे वो क्वार्टर नाही' मी तिमाही बद्दल बोलतोय.

या गमतीशीर व्हिडिओ आता ट्विटर आणि इन्स्टाग्रामसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.केवळ ट्विटरवर 1.88 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले आणि हा हेत्विक नावाचा विद्यार्थी नेमका कोण आहे जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता लागली आहे.

Viral Video: Teacher asks question for quarter student horrible answer
Lakhimpur Kheri Case: अखेर आशिष मिश्रा क्राईम ब्रँचमध्ये दाखल

यावरकमेंट करताना एकाने सांगितले कि , "आजची मुलं वेगळया पातळीवर आहेत."तर दुसऱ्याने लिहिले की "हे फक्त फक्त सीए लेक्चर्समध्येच घडते."

"मी नेहमीच विश्वास ठेवला आहे आणि उपदेश केला आहे की शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न विचारण्याची परवानगी देणे. कधीकधी विद्यार्थ्यांकडे कचऱ्याची उत्तरे देखील असतात की एक चतुर्थांश 30 मिली असते परंतु ते सुधारणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे की ते 30 मिली नाही 180 मिली नाही. तीन महिने आहेत आणि आम्ही विद्यार्थ्यांना ते नेहमी शिकवत राहू, "पुरोहित यांनी टाइम्स नाऊला सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com