Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Mount Everest and Himalayan range Video: नेपाळमध्ये असणारी हिमालयाची पर्वत रांग बिहारमधील जयनगर या गावापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे.
Himalayas visible from Bihar video
Mount Everest and Himalayan range Video From Bihar Viral X- Post
Published on
Updated on

बिहार: जगातील एक सर्वांत उंच शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट आणि हिमालय पर्वत रांगांचा मनमोहक नजारा समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे याचा व्हिडिओ बिहारमधून चित्रित करण्यात आला आहे. भारतीय सीमेवरील जयनगर गावातून हे मनमोहक दृष्य कॅमेरामध्ये कैद करण्यात आले आहे.

भारताच्या शेजारील नेपाळमध्ये असणारी हिमालयाची पर्वत रांग बिहारमधील जयनगर या गावापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे. येथेच जगातील एक सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट आहे. थंडीच्या वातावरणामुळे या भागातील दृष्यमानता वाढली आहे, यामुळे नेपाळमधील हिमालयाची पर्वत रांग आणि माऊंट एव्हरेस्ट शिखर स्पष्टपणे दिसू लागले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Himalayas visible from Bihar video
Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

सत्यम राज या व्यक्तीने सोशल मीडिया एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हिमालयाची पर्वत रांग आणि माऊंट एव्हरेस्ट शिखर स्पष्टपणे दिसत आहेत. विशेष म्हणजे बिहारमधून पहिल्यांदाच अशाप्रकारचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. यापूर्वी कोरोना काळात प्रदुषण कमी झाल्यानंतर अशाप्रकारचे दृष्य पाहायला मिळाले होते, असे स्थानिकांनी म्हटले आहे.

Himalayas visible from Bihar video
Konkan Railway: आरक्षित डबा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये माऊंट एव्हरेस्ट देखील एक शिखर आहे. शिखराची असणारी उंची हा देखील एक मुद्दा बिहारमधून ते दिसण्यासाठी कारणीभूत असू शकते असे सांगितले जात आहे. तसेच, थंडीमुळे स्वच्छ झालेले वातावरण हाही मुद्दा असू शकतो. दरम्यान, बिहारमधून दिसणारा हा मनमोहक नजारा सध्या सोशल मीडियावर चर्चेसह आश्चर्चयाचा विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com