महामार्गावर पंक्चर काढणाऱ्या मुलीने पोलीसाला बांधली राखी, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ (Viral Video) यूपीच्या इटावा जिल्ह्यातीला आहे. इटावा जिल्ह्यातील भरथना पोलीस स्टेशनचे सीओ (सर्कल ऑफिसर) चंद्रपाल सिंह यांच्यासह, त्यांच्या सोबत त्यांचा चालक देखील आहे.
Viral video: Girl working at tyre puncture warehouse ties Rakhi to cop
Viral video: Girl working at tyre puncture warehouse ties Rakhi to copDainik Gomantak

रक्षाबंधन (RakshaBandhan) म्हणजे भाऊ बहिणीच्या (Brother Sister) गोड नात्याचा उत्सव (Festival) या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत आपल्या नात्याची दोर अधिक घट्ट करते. रक्षाबंधनाला बहिणीने राखी बांधण्याचे दृश्य खरंच असामान्य असते. भाऊ-बहिणीच्या प्रेमाला समर्पित या उत्सवात उत्तर प्रदेशातून एक अनोखे दृश्य समोर येत आहे,हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे, हे पाहून प्रत्येकजण भावनिक होत पोलिसांचे कौतुकही करत आहेत. (Viral video: Girl working at tyre puncture warehouse ties Rakhi to cop)

बुंदेली हलचल नावाच्या एका लोकल पोर्टल वरून देखील हा व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ (Viral Video) यूपीच्या (Uttar Pradesh) इटावा (Etawah) जिल्ह्यातीला आहे. इटावा जिल्ह्यातील भरथना पोलीस स्टेशनचे सीओ (सर्कल ऑफिसर) चंद्रपाल सिंह यांच्यासह, त्यांच्या सोबत त्यांचा चालक देखील आहे. आणि या व्हिडिओतले दृश्य म्हणजे हे दोघेही महामार्गावर असलेल्या पंक्चर दुकान चालवणाऱ्या एका मुलीकडून राखी बांधून घेताना दिसत आहेत, एवढंच नाही तर त्यांनी त्या मुलीला ओवाळणी म्हणून पैसे देखील दिले आहेत.

राखी बांधताना, मुलगी आणि स्वतः पोलीस देखील खूप भावनिक होताना दिसले. मुलीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. हे संपूर्ण दृश्य बकेवार जवळ NH2 महामार्गाचे आहे.

Viral video: Girl working at tyre puncture warehouse ties Rakhi to cop
Chhattisgarh: नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार

यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी देखील असाच एक भावनिक व्हिडिओ समोर आला होता. राजस्थानच्या नागौरमध्ये एका बहिणीने भावाच्या चितावर राखी बांधून दिलेले वचन पाळले होते.

नागौर जिल्ह्यातील हरसौर गावात राहणारे चिरंजीलाल हे बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल होते. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत परेड दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यानंतर, 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळ गावी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. रक्षाबंधनच्या दिवशी बहिण स्मशानभूमीत पोहोचली आणि चिरंजीलालाच्या चितावर लाकडाला राखी बांधली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com