Viral Video: अटारी बॉर्डरवर पाकड्यांची 'पोलखोल'! पाकिस्तानच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य, तर भारताची बाजू स्वच्छ; पावसाचा व्हिडिओ व्हायरल

Attari-Wagah Border Viral Video: अटारी-वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानमधील मोठा फरक जगासमोर आणला आहे. हा व्हिडिओ पावसाळ्यातील परिस्थिती दर्शवतो.
Attari-Wagah Border Viral Video
Attari-Wagah Border Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Attari-Wagah Border Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने पुन्हा एकदा अटारी-वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानमधील मोठा फरक जगासमोर आणला आहे. हा व्हिडिओ पावसाळ्यातील परिस्थिती दर्शवतो, ज्यात भारताच्या बाजूला स्वच्छता आणि सुव्यवस्था दिसून येते, तर पाकिस्तानच्या बाजूला पाणी साचलेले आणि कचरा विखुरलेला दिसतो. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर एक नवी चर्चा सुरु झाली आहे, ज्यात अनेक लोक भारताच्या शिस्तीचे कौतुक करत आहेत, तर पाकिस्तानच्या स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये दिसली अटारी बॉर्डरची भयावह स्थिती

व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, अटारी बॉर्डरवर भारतीय बाजू अत्यंत स्वच्छ आणि सुव्यवस्थित आहे. लोक कोणत्याही अडथळ्याशिवाय सामान्यपणे फिरत आहेत आणि कोणतीही अस्वच्छता दिसत नाही. याउलट, पाकिस्तानच्या (Pakistan) बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून सर्वत्र कचरा विखुरलेला आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी बाजूला लोकांना साचलेल्या पाण्यातूनच चालावे लागत आहे. भारतीय बाजू किती स्वच्छ आहे, हे यातून स्पष्ट होते. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी रेंजर्स आणि इतर लोक पाण्यात उभे राहून एकमेकांशी बोलताना दिसत आहेत, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता समोर येते.

Attari-Wagah Border Viral Video
Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

पावसानंतर दोन्ही देशांच्या सीमेवरील ही स्थिती पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. दोन्ही देशांच्या सार्वजनिक जागांच्या देखभालीमध्ये किती मोठा फरक आहे, हे हा व्हिडिओ दाखवून देतो.

सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया

दुसरीकडे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेक यूजर्संनी भारताच्या स्वच्छतेचे आणि व्यवस्थेचे कौतुक केले. काही नेटिझन्सनी तर या स्थितीला दोन्ही देशांमधील प्रशासकीय फरकाचा आरसाच म्हटले. एका यूजरने प्रतिक्रिया देताना लिहिले, ‘हा व्हिडिओ स्पष्टपणे दर्शवतो की भारत आणि पाकिस्तानमध्ये नेमका काय फरक आहे.’ तर दुसऱ्या एका यूजरने म्हटले की, ‘पाकिस्तानची ही स्थिती पाहून आपल्याला हे विचार करायला लावते की ते आपल्या देशाचे व्यवस्थापन कसे करतात.’ या कमेंट्सवरुन दोन्ही देशांमधील नागरिकांच्या मनात याबद्दल किती फरक आहे, हे दिसून येते.

Attari-Wagah Border Viral Video
Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

अटारी-वाघा बॉर्डरचे महत्त्व

अटारी-वाघा बॉर्डर हा भारत (India) आणि पाकिस्तानमधील एक प्रमुख सीमा बिंदू आहे. ही जागा केवळ सीमेच्या दृष्टीनेच नाही, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाची आहे. येथे दररोज होणारा बीटिंग रिट्रीट सेरेमनी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही सेरेमनी दोन्ही देशांच्या सैन्याच्या शिस्तीचे आणि त्यांच्यातील संबंधांचे प्रतीक आहे. मात्र, हा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर सीमा भागातील वास्तवावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिथे एका बाजूला दोन्ही देशांमधील सैन्य शिस्तीचे प्रदर्शन करतात, तिथे दुसऱ्या बाजूला अस्वच्छता आणि अव्यवस्था दिसून येते. यावरुन असे दिसते की, केवळ दिखावा महत्त्वाचा नसतो, तर खरी व्यवस्था आणि स्वच्छताच देशाचे खरे चित्र दाखवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com