पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक निदर्शने सुरू

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत जमावाला पांगवले.
Violent protests continue for second day in West Bengal
Violent protests continue for second day in West Bengal Dainik Gomantak
Published on
Updated on

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत जमावाला पांगवले. मिळालेल्या माहितीनुसार, हावडा येथील पंचला बाजार येथील ताजी घटना आहे. येथे पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली.

Violent protests continue for second day in West Bengal
Jammu and Kashmir: खांडीपोरा भागात चकमक; 1 दहशतवादी ठार

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, हावडा आणि राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. 15 जूनपर्यंत कलम 144 लागू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कालही अनेक ठिकाणी जाळपोळ झाली
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी निदर्शने केली. शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने लोक बाहेर आले आणि त्यांनी नुपूर शर्माच्या अटकेची मागणी केली. याशिवाय पश्चिम बंगालच्या हावडामध्येही मोठा गोंधळ झाला. शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने नमाज्यांनी हावडा येथील राष्ट्रीय महामार्ग 116 वर निदर्शन केले. यादरम्यान वाहने, रुग्णवाहिका, पोलिस वाहने, अग्निशमन दल, ट्रक आदी वाहतूक कोंडीत अडकली. सीएम ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले. सुमारे 10 हल्लेखोरांना अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन
Kerala MLA MP Cabinet Berth Fraud Scam
Dangerous Bike Stunt Video
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com