UP पोलिसांचे दुष्कृत्य, हात जोडून उभ्या असलेल्या वृद्धाला पोलिसाने मारल्या लाथा

दरम्यान सोशल मीडियावर (Social media) असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी हात जोडून उभ्या असलेल्या एका वृद्धाला लाथ मारताना दिसत आहे.
UP Police
UP PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

बांदा : अनेकदा पोलिसांकडून होत असलेल्या गैरवर्तनाच्या घटना समोर येत असतात. दरम्यान सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी हात जोडून उभ्या असलेल्या एका वृद्धाला लाथ मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ माजी आयपीएस अधिकाऱ्यानेही ट्विटरवर शेअर केला आहे. (Video Viral UP police Kicked Old Man Who Requestion Him Not To Beat)

दरम्यान, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यातील आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती पोलिसांसमोर हात जोडून बोलताना दिसत आहे. मात्र बोलत असलेल्या वृध्द व्यक्तीला पोलीस कर्मचारी लाथ मारतो. त्यानंतर त्यांना दोनदा लाथ मारुन 'भाग भाग' म्हणतो. आजूबाजूला लोकांची गर्दीही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

UP Police
शोपियामधील दहशतवादी हल्ल्यात J&K पोलिसांचे ASI जखमी, दहशतवाद्यांचा शोध सुरु

तसेच, पोलिसांने पीडित व्यक्तीचे वर्णन 'विकृत व्यक्ती' असे केले आहे. 'हा म्हातारा "विकृत" असल्याचे म्हणत पोलिसाने म्हटले.

शिवाय, 29 जानेवारीच्या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचे युपी पोलिसांकडून (Uttar Pradesh Police) सांगण्यात आले आहे. त्याचवेळी माजी आयपीएस अधिकारी आर.के. विज (IPS R.K. Vij) यांनी व्हिडिओ शेअर करताना या पोलिस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. काही प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांना पैशांची गरज नसते, असेही कॅप्शनही त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला दिले आहे. योग्य प्रशिक्षण आणि कठोर शिस्तबद्ध कारवाईनेच सुधारणा घडवून आणता येतात, असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com