Lulu Mallमध्ये हनुमान चालीसा वाचतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणांना अटक

लुलू मॉलमध्ये पकडलेल्या आंदोलकांसोबत या दोन्ही तरुणांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Lulu Mall
Lulu MallTwitter

Lulu Mall Row: लखनऊच्या लुलू मॉलमध्ये नमाज झाल्यानंतर आता हनुमान चालीसा पठणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. लुलू मॉलमध्ये दोन युवक जय श्री राम म्हणत हनुमान चालिसाचे पठण करताना दिसून येत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी दोन्ही तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यानंतर आज लुलू मॉलमध्ये पकडलेल्या आंदोलकांसोबत या दोन्ही तरुणांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Lulu Mall
Presidential Election: द्रौपदी मुर्मूंचा आदर, मात्र 'आप'चा यशवंत सिन्हांना पाठींबा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या प्रसिद्ध लुलू मॉलमध्ये नमाज अदा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. मॉलमध्ये नमाज अदा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज मोठ्या संख्येने हिंदू युवा मंचचे कार्यकर्तेही लुलू मॉलमध्ये पोहोचले आणि तेथे हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सुमारे 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Lulu Mall
पंजाबमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, सुव्यवस्था बिघडल्याचा कॉंग्रेसचा आरोप

आदल्या दिवशी लुलू मॉलच्या प्रवेशद्वाराबाहेर सुंदरकांडचे पठण करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली होती. कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखिल भारतीय हिंदू महासभा निषेध करत आहे. व्हिडिओमध्ये पुरुषांचा एक गट मॉलमध्ये नमाज अदा करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर लुलू मॉलच्या प्रतिनिधींच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अनेक अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com