पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या संगरुर मतदारसंघातून पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) उमेदवार सिमरनजीत सिंग मान विजयी झाले. यातच आज सिमरनजीत सिंग मान यांनी आपल्या विजयाचे श्रेय शिख बंडखोर नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले याला दिले आहे. ते म्हणाले, "भारतीय लष्कराकडून काश्मीमध्ये होत असलेल्या दडपशाहीकडे आपण संसदेचे लक्ष वेधणार आहोत."(victory of bhindranwales teachings punjabs simranjit mann on bypoll win)
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणारे सिमरनजीत मान म्हणाले की, 'बिहार (Bihar) आणि छत्तीसगडमधील (Chhattisgarh) आदिवासींना नक्षलवादी म्हणून मारल्याचा मुद्दाही उपस्थित करणार आहे.'
दुसरीकडे, सिमरनजीत मान यांच्या विजयावर काँग्रेसने (Congress) चिंता व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटले की, 'आज संगरुरमध्ये लोकशाहीचा पराभव झाला.'
काँग्रेसचे रवनीत सिंग बिट्टू यांनी ट्विट केले की, "जनतेने दिलेला जनादेश हा नेहमीच सर्वोच्च असतो आणि यावेळी तो सिमरनजीत सिंग मान यांच्या बाजूने गेला आहे. तथापि, मान यांची विचारधारा भूतकाळात पंजाब आणि आपल्या देशासाठी घातक ठरली आहे. त्यांचा खलिस्तानी अजेंडा आहे. पंजाब आणि देशाच्या शांतता आणि अखंडतेला धोका आहे.''
"हा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि जर्नेलसिंग भिंद्रनवालेच्या विचारधारेचा विजय आहे," मान यांनी आपल्या विजयानंतर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या पाठिशी असलेल्या शीख नेत्याचा हवाला देत म्हटले.
ते पुढे म्हणाले, “दीपसिंग सिद्धू आणि सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूमुळे शीख समुदाय अत्यंत व्यथित झाला आहे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.