Vice-Presidential Election: 725 खासदारांनी बजावला मतदानाचा हक्क; मतमोजणीली सुरुवात

संसद भवनात सुरू असलेल्या उपराष्ट्रपतीपदासाठीच्या मतदानासाठी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांनी व्हील चेअरवर बसून मतदान केले.
Vice-Presidential Election
Vice-Presidential ElectionANI

Vice-Presidential Elections: देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी आज मतदान झाले आहे. आता सायंकाळी 6 वाजतापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. संसद भवनात सुरू असलेल्या मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्र्यांनी मतदान केले. माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांनीही व्हील चेअरवर बसून मतदान केले.

या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आणि संयुक्त विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे. 80 वर्षीय अल्वा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. त्याच वेळी, धनखड 71 वर्षांचे आहेत आणि ते राजस्थानच्या प्रभावशाली जाट समुदायाचे आहेत, त्यांची पार्श्वभूमी समाजवादी आहे.

Vice-Presidential Election
Vice President Election 2022: ममता बॅनर्जींनी का सोडली विरोधकांची साथ?

आकडेवारीवर नजर टाकली तर पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांची स्थिती मजबूत दिसत आहे. टीएमसीने मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याचे जाहीर केल्याने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विरोधी पक्षांमध्येही मतभेद समोर आले आहेत. त्याचवेळी TRS, AAP, AIMIM आणि झारखंड मुक्ती मोर्चाने अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर JDU, YSR काँग्रेस, BSP, AIADMK आणि शिवसेनेने धनखड यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

या निवडणुकीत भाजपचे उमेदवार जगदीप धनखड स्वबळावर निवडणूक जिंकू शकतात अशी स्थिती आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण 790 सदस्य हे उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये येतात. यात राज्यसभेतील 245 सदस्य आणि लोकसभेतील 545 सदस्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी उमेदवाराला मतदान प्रक्रियेत 395 पेक्षा जास्त मते मिळवावी लागतील. त्याचवेळी सत्ताधारी भाजपचे लोकसभेत 303 आणि राज्यसभेत 91सदस्य आहेत. ही संख्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे जगदीप धनखड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

भाजपचे स्वतःचे 394 खासदार, 5 नामनिर्देशित खासदार आणि JDU, AIADMK, LJP या मित्रपक्षांचे 47 खासदार आहेत. अशा प्रकारे एनडीएच्या खासदारांची संख्या 446 वर पोहोचली आहे. त्याचवेळी धनखड यांना पाठिंबा देणारे इतर पक्ष बीजेडी 21, वायएसआरसी 31, बसपा 11, अकाली दल 2, टीडीपी 4 आणि शिंदे गट शिवसेना 12 आहेत. अशाप्रकारे एकूण 527 खासदार धनखड यांच्या बाजूने दिसत आहेत.

Vice-Presidential Election
लाजिरवाणे! ग्वाल्हेरमध्ये गायीला बनवली वासनेची शिकार

उपराष्ट्रपतींची निवड समानुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीनुसार एकल हस्तांतरणीय मताद्वारे केली जाईल आणि निवडणूक गुप्त मतदानाद्वारे होईल. यामध्ये मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर पसंती चिन्हांकित करावे लागतात. निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सायंकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. एनडीएकडून जगदीप धनखड हे या पदाचे उमेदवार असताना विरोधकांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, बसपा आणि तेलगू देसम पक्षाने धनखड यांना पाठिंबा जाहीर केला. या पक्षांचे दोन्ही सभागृहात 68 सदस्य आहेत. शिवसेनेचे 12 सदस्यही लोकसभेत भाजपसोबत आहेत. त्यामुळे निवडणुकीत धनखड यांना 65 टक्क्यांहून अधिक मते मिळण्याचा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com