Varun Gandhi Plan For 2024 Lok Sabha Election: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप खासदार वरुण गांधी यांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. 2024 मध्ये आपण कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार आहे ते वरुण गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
यासोबतच त्यांनी आपली तयारीही सुरु केली आहे. समर्थकांपर्यंत पोहोचून ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. वरुण गांधी सध्या उत्तर प्रदेशातील पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार वरुण गांधी पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी सोमवारी त्यांचा संसदीय मतदारसंघ पिलीभीत गाठला. यावेळी ते म्हणाले की, 'राजकारणात मी सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी आलो आहे.'
यासोबतच वरुण यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पिलीभीतमधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी ते म्हणाले की, 'मी आणि माझी आई पीलीभीतमधील प्रत्येक व्यक्तीचे सुख आणि दु:ख समजतो. पीलीभीतशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे.'
वरुण गांधी यांनी 2024 मध्ये पिलीभीतमधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत, परंतु त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत अजूनही शंका आहे. ते 2024 ची निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, कारण काही काळापासून ते भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेस (Congress) किंवा समाजवादी पक्ष (एसपी) मध्ये जातील अशी अटकळ बांधली जात आहे.
याशिवाय ते आपल्या आई मनेका गांधींसोबत नवा पक्ष काढू शकतात, अशीही चर्चा आहे. यासोबतच संयुक्त विरोधी पक्षाचा उमेदवार होणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अद्याप वरुण गांधी यांनी अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
तसेच, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार वरुण गांधी बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसह अनेक मुद्द्यांवर आपल्याच सरकारला सातत्याने प्रश्न करत आहेत. त्यामुळे ते भाजप सोडणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.
तथापि, ते पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर पिलीभीतमधून निवडणूक लढवतील अशीही शक्यता आहे, कारण त्यांनी कधीही पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.