Bike Stunt Viral: बाईकच्या टाकीवर बायकोला बसवलं अन्... लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवघेणा स्टंट; जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल

Varanasi Couple Dangerous Bike Reel: व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण विनाहेल्मेट अत्यंत वेगाने बाईक चालवताना दिसत आहे.
Varanasi Couple Dangerous Bike Reel
Couple performing a dangerous motorcycle stunt for a viral social media videoDainik Gomantak
Published on
Updated on

Varanasi Couple Dangerous Bike Reel: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला असून, लोकांमध्ये रील बनवण्याची भलतीच क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या घाईत अनेक जण थेट आपल्या जिवाशीच खेळत असल्याचे वारंवार समोर येत आहे. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा आणि वाहतूक नियमांचे धिंडवडे काढणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बाबतपूर परिसरातील हा धक्कादायक प्रकार असून, यात एका जोडप्याने स्टंटबाजीच्या नादात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण विनाहेल्मेट अत्यंत वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्याची पत्नी मागच्या सीटवर बसण्याऐवजी बाईकच्या टाकीवर त्याच्याकडे तोंड करुन, म्हणजेच उलटी बसली आहे. तिनेही हेल्मेट परिधान केलेले नाही. या जीवघेण्या स्थितीत चालत्या बाईकवर पेट्रोल टँकवर बसून ती महिला मोबाईलवर व्हिडिओ बनवत आहे आणि दोघेही एका हिंदी चित्रपटातील गाण्यावर रील तयार करण्यात मग्न आहेत. कॅमेऱ्यात पाहून पोज देताना त्यांना आपण किती मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहोत, याचे साधे भानही राहिलेले नाही.

Varanasi Couple Dangerous Bike Reel
Viral Video: 'FIFA World Cup' हातातून निसटला, मेस्सी गुडघ्यावर बसून रडला; फायनलनंतरचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ 'एक्स' वर पोस्ट होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत या जोडप्यावर आणि अशा धोकादायक ट्रेंड्सवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत वाराणसीच्या गोमती झोनचे डीसीपी आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिले. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्हिडिओचा तपास बाडगाव पोलीस ठाण्याकडून करण्यात आला. मात्र, व्हिडिओमध्ये बाईकचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने चालकाची ओळख पटू शकलेली नाही.

Varanasi Couple Dangerous Bike Reel
King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

सध्या व्हिडिओतील व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु असून, संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रकरण सायबर सेलकडे वर्ग करण्यात आले. माहिती मिळताच नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या अशा बेजबाबदार नागरिकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com