
Vamika Poem for Virat: प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे एक खास व्यक्तीमत्व असतात. वडिलांनी तिच्यासाठी घेतलेले कष्ट ती कधीच विसरत नाही. आईसोबत जसे सहज बोलणे होते, तसे बाबांसोबत होत नसले तरी, बाबा कायमच मुलीच्या मनात एक विशेष स्थान टिकवून असतात. त्यांच्या कुशीत मुलीला सर्वाधिक सुरक्षित वाटते.
अशीच काहीशी गोड भावना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची लाडकी चिमुकली वामिका हिने आपल्या बाबांसाठी व्यक्त केली आहे. फादर्स डेच्या निमित्ताने वामिकाने वडील विराट कोहलीसाठी एक खास कविता लिहिली आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने आज फादर्स डेच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील छोट्याशा वामिकाच्या अक्षरातील कविता सध्या अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. ही कविता वामिकाने स्वतः लिहिलेली नसली तरी, ती कदाचित अनुष्काने वामिकाच्या मनातलं प्रेम आणि भावना व्यक्त करत लिहिली असावी, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.
या कवितेत वामिका म्हणते, "बाबा माझ्या भावासारखा दिसतो, माझ्यासोबत मेकअप-मेकअप खेळतो, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तो सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतो."
या कवितेच्या शेवटी मात्र वामिकाने स्वतःच्या निरागस अक्षरात तिचं नाव लिहिलं आहे, ज्यामुळे विराट आणि मुलगी वामिका यांच्यातील वडील-मुलीचं गोड आणि घट्ट नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
ही पोस्ट पाहून चाहते खूपच भावुक झाले आहेत. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूचा मुलीसोबतचा हा गोड क्षण पाहून, अनेक पालकांना आपल्या मुलांसोबतच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ही कविता केवळ विराट-वामिकाचे नाते दर्शवत नाही, तर प्रत्येक बाप-मुलीच्या नात्यातील निरागसता आणि जिव्हाळा समोर आणते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.