Uttarakhand: महिला रिसेप्शनिस्ट हत्येप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक

आरोपीने कालव्यात ढकलल्याची दिली कबुली
Crime News
Crime NewsDainik Gomantak

पाच दिवसांपूर्वी उत्तराखंड येथील एका रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय महिला रिसेप्शनिस्टची हत्या झाली आहे. या प्रकरणात उत्तराखंडमधील भाजप माजी मंत्र्याच्या मुलासह पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य “मुख्य आरोपी” आहे. विनोद आर्य हे त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये राज्यमंत्री होते.

(Uttarakhand BJP-leader son Vinod Arya Arrested killing receptionist girl)

Crime News
Supreme Court: 'अल्पसंख्याक आयोग कायद्याच्या वैधतेला आव्हान दिले जाणार नाही'

मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी पुलकित आर्य याने महिलेला कालव्यात ढकलल्याची कबुली दिल्यानंतर पुलकितच्या रिसॉर्ट व्यवस्थापकासह मॅनेजर सौरभ भास्कर आणि अंकित म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Crime News
Bulldozer Action: योगी स्टाइलमध्ये खट्टर सरकार, कुख्यात गुंडाच्या 3 मजली कोठीवर कारवाई

“पीडितेच्या फोन चॅटवरून असे सूचित होते की, आरोपी तिला त्रास देत होते. आरोपीने सांगितले की मुलगी ऋषिकेशला भेट देण्यासाठी रात्री 8 च्या सुमारास रिसॉर्टमधून बाहेर पडली. तिथे त्यांच्यासोबत मोमो आणि दारू होते. यानंतर कालव्याजवळ पुलकित आणि अंकिता यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या वादात अंकिताने पुलकितचा फोन कालव्यात फेकून दिला. त्यानंतर त्याने तिला कालव्यात ढकलले,” अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक (एसएसपी) यशवंत सिंग यांनी दिली आहे.

एसएसपी म्हणाले की, “आरोपींनी कबुली दिली असुन त्यांनी मुलीला चिल्ला पॉवर हाऊस कालव्यात ढकलले आणि त्यामुळे ही हत्या झाली. मात्र, आम्ही अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. सुरुवातीला आयपीसी कलम 365 (अपहरण) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. आम्ही आयपीसी कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावे गायब करणे किंवा खोटी माहिती देणे) जोडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com