Bulldozer Action: योगी स्टाइलमध्ये खट्टर सरकार, कुख्यात गुंडाच्या 3 मजली कोठीवर कारवाई

Demolition in Haryana: हरियाणाच्या मनोहर लाल खट्टर सरकारनेही आता यूपीच्या योगी सरकारचा मार्ग अवलंबला आहे.
House
HouseDainik Gomantak
Published on
Updated on

Haryana Bulldozer Action: हरियाणाच्या मनोहर लाल खट्टर सरकारनेही आता यूपीच्या योगी सरकारचा मार्ग अवलंबला आहे. हरियाणातील कुख्यात गुंड सुबे गुर्जरवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. मानेसरमध्ये गुर्जरने बांधलेले बेकायदेशीर घर मानेसर कॉर्पोरेशनच्या पथकाने पाडले आहे. महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी बुलडोझरसह गुर्जरच्या घरी पोहोचून ही कारवाई केली. यापूर्वी गुरुवारीही गुर्जरच्या घरावर बुलडोझरची कारवाई झाली होती.

सलग दुसऱ्या दिवशी बुलडोझरची कारवाई

मानेसर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर जमिनीवर गुर्जरने घर बांधले होते. सुमारे साडेतीन हजार स्क्वेअर यार्डमध्ये हे घर बांधण्यात आले होते. गुरुवारीही इथे कारवाई करण्यात आली होती. हे घर बांधण्यासाठी गुर्जरने महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. ते बेकायदेशीरपणे बांधलेले घर होते. त्यामुळे महापालिकेला बुलडोझरची कारवाई करावी लागली. यावेळी गावात मोठा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

House
Punjab-Haryana HC: सुसाईड नोटमधील नाव एखाद्याला दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही

तुरुंगात शिक्षा भोगतोय गुर्जर

गँगस्टर सुबेसिंग गुर्जरचा हरियाणा (Haryana), दिल्ली, राजस्थान (Rajasthan), उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये दबदबा होता. त्याने 40 हून अधिक प्रकरणांमध्ये तुरुंगाची हवा खाल्ली आहे. हरियाणात 11 खून आणि 12 खुनाच्या प्रयत्नातील तो आरोपी आहे. सध्या गुर्जर भोंडसी कारागृहात शिक्षा भोगत आहे.

House
Punjab-Haryana HC: 'कुठेतरी जावून मर' म्हणणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे !

15 वर्षांपासून गुन्हेगारीच्या जगात सक्रिय

विशेष म्हणजे, गँगस्टर सुबेसिंग 2005 पासून गँगस्टर कौशलसोबत गुन्हेगारीच्या दुनियेत सक्रिय होता. या दोघांचा खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, धमकी अशा 40 हून अधिक घटनांमध्ये सहभाग होता. वर्षभरापूर्वी त्याला एसटीएफच्या पथकाने पकडले होते. सुबेसिंग हा मूळचा बडगुर्जर गावचा रहिवासी असून, जिथे ही बुलडोझर कारवाई झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com