उत्तराखंडमधून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हरीश रावत यांना उत्तराखंडच्या लालकुआन मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हरीश रावत हे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. हरीश रावत यांचा 13893 मतांनी पराभव झाला आहे. (Uttarakhand election result 2022 News)
आज विधानसभा निवडणुकीच्या 23 दिवसांनंतर उत्तराखंडमधील (Uttarakhand) सर्व 70 विधानसभा जागांवर निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत आणि लवकरच फायनल निकालही पाहायला मिळणार आहे. ज्या प्रकारे निकाल समोर येत आहेत, त्यावरून राज्यात भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसून येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि हरिद्वार शहर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मदन कौशिक हे मतमोजणीच्या 8 फेऱ्यांनंतर 8 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खातिमा विधानसभा मतदारसंघातील पाचव्या फेरीत भाजपचे (BJP) पुष्कर सिंह धामी यांना 2908 तर काँग्रेसचे भुवनचंद्र कापरी यांना 4702 मते मिळाली. आतापर्यंत भाजपला 19979 आणि काँग्रेसला 24060 मते मिळाली आहेत. धामी चार हजार मतांनी मागे आहेत.
दरम्यान, गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) चुरस आहे. गोव्यातील विधानसभेच्या (Assembly) 40 जागांचा कल पाहिला तर भाजपला 19 तर काँग्रेसला 12 जागा मिळत आहेत. गोव्यात टीएमसी 3 जिंकताना दिसत आहे तर AAP 2 आणि इतरांना 4 जागी विजय मिळाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.